Join us

फ्रायडे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 05:21 IST

पूर्वी वर्षाला जेमतेम चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने प्रेक्षकांना नव्या चित्रपटांची उत्सुकता लागलेली असायची. त्यातही बरेचसे निर्माते बॉक्स आॅफिसवर ...

पूर्वी वर्षाला जेमतेम चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने प्रेक्षकांना नव्या चित्रपटांची उत्सुकता लागलेली असायची. त्यातही बरेचसे निर्माते बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यासाठी दिवाळी, ईद, ख्रिसमस या सणांनाच आपले चित्रपट प्रदर्शित करायचे. आता मात्र चित्रपटांची संख्या वाढली आहे. त्यातही ज्यांना जी भाषा आवडते त्या भाषेतील चित्रपट दर शुक्रवारी पहायला मिळत आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड अन् मराठी मुव्हीजचा धमाका एकत्र अनुभवता येत आहे. या शुक्रवारीही असेच काहीचे चित्र होते. त्याचाच हा आढावा...या फ्रायडेला एक दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा चित्रपट रिलिज झाले आहेत. त्यात बॉलिवूडचे ‘तेरे बिन लादेन : डेड आॅर अलाईव्ह, अलीगढ, लव्ह शगुन’, हॉलिवूडचे ‘द रेवेनेंट, गॉड्स आॅफ इजिप्त, ट्रिपल-९ तर मराठीत ‘बाबांची शाळा, तिचा उंबरठा’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या फ्रायडेला कॉमेडी, अ‍ॅक्शन अन् इमोशनल ड्रामा याचा अनुभव घेता येईल. तेरे बिन लादेन : डेड आॅर अलाइव्ह२०१० मध्ये आलेल्या ‘तेरे बिन लादेन’ या कॉमेडी चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘तेरे बिन लादेन: डेड आॅर अलाइव्ह’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खदखदून हसविणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता तो प्रत्यक्ष रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी असला तरी याला ऊर्दूचा तडका देण्यात आल्याने भाषेची धम्माल यात पहायला मिळणार आहे. अलीगढ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या बायोपिक चित्रपटातून प्रा. डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरास याची कथा प्रेक्षकांसमोर मांडली गेली आहे. समलैंगिकतेवर आधारित असल्याने या चित्रपटाबाबत अनेक वादही जोडले गेले आहेत. काही जण तर या चित्रपटाच्या विरोधात कोर्टातही गेलेत. पण, कोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास मनाई केली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करीत आहेत. द रेवेनेंटएलेहांद्रो गोंसालेस इनयारिटू दिग्दर्शित ‘द रेवेनेंट’ या हॉलिवूडपटात तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. इंग्रजी चित्रपटांचा एक खास चाहता वर्ग आहे. त्यातही अ‍ॅक्शन चित्रपटांबाबत क्रेझी असणाºयांची संख्या मोठी आहे. ‘द रेवेनेंट’ हा चित्रपट अशा प्रेक्षकांसाठी अगदी परफेक्ट आहे. त्यातील साहस दृश्ये या प्रेक्षकांना अजिबात निराश करीत नाहीत.