Join us  

‘बहिणीसाठी फ्लाईट बूक केल्याची बातमी खोटी’; अक्षयकुमारने ट्विट करत केला खुलासा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 7:50 PM

अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केलीय. बीएमसीला तीन कोटी तर सिंटाला ४५ लाखांची मदत केलीय तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे.

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. असे असताना सर्वसामान्यांसहित बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ येत आहे. सोनू सूद, अक्षयकुमार या मंडळींनी मोठया प्रमाणात मदत देऊ केली आहे. मात्र, अक्षयकुमार सध्या खुपच नाराज आहे. अशातच एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या पोर्टलने एक चुकीची बातमी प्रकाशित केली आहे. ती बातमी खोटी असल्याचे त्याने नुकतेच टिवट करत सांगितले आहे. 

अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केलीय. बीएमसीला तीन कोटी तर सिंटाला ४५ लाखांची मदत केलीय तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे. चौथ्या फेजमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये देशाअंतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अक्षयने बहिण अल्का भाटिया आणि तिच्या मुलांना मुंबईतून दिल्लीत पाठवण्यासाठी संपूर्ण फ्लाईट बुक केली, असे वृत्त एका इंग्रजी ऑनलाईन पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले होते. पण, अक्षयने खुलासा करत सांगितले की, ‘ही बातमी चुकीची असून मी कुठलीही चार्टर विमानाची फ्लाईट बूक केलेली नाही. माझी बहिण लॉकडाऊनमध्ये कुठेही गेली नाही. तिला एकच अपत्य असून अशा चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार आहे,’ असे त्याने टिवटमध्ये म्हटले आहे. 

अक्षय कुमार पहिला असा सेलिब्रेटी आहे जो कोरोना व्हायरसमध्ये शूटिंगसाठी गेला होता. २० लोकांच्या टीमसोबत अक्षयने एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. लॉकडाऊननंतर लोकांच्या असलेल्या जबाबदाऱ्या या या विषयावरील एका जाहिरातीचे चित्रीकरण केले. ही जाहिरात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी चित्रीत केली गेली असून चित्रीकरण करताना सगळ्यांनी मास्क घातले होते. तसेच कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्रकारे फैलाव होणार नाही याची काळजी चित्रीकरण करताना घेण्यात आली. या जाहिरातीचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड