Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधील सन‘सनी’ला पाच वर्षे पूर्ण; वाचा सनी लिओनीचा थक्क करणारा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:02 IST

पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिला ३ आॅगस्ट रोजी बॉलिवूडमध्ये पाच वर्षे पूर्ण ...

पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिला ३ आॅगस्ट रोजी बॉलिवूडमध्ये पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. तिचा हा पाच वर्षांचा प्रवास एखाद्या सन‘सनी’सारखा होता, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. २०१२ मध्ये दिग्दर्शक पूजा भट्ट हिने ‘जिस्म-२’मध्ये सनीला संधी दिली. तेव्हापासून सनीने बॉलिवूडमध्ये अशी काही मजल मारली की, तिला पाचच वर्षांत सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला. वास्तविक सनीची इंडियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमधून सुरु झाली. सनीने ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीजनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील तिचा प्रवास थक्क करणारा होता. तिचे जलवे बघून बॉलिवूड निर्माते तिला लॉन्च करण्यास उत्सुक होते.खरं तर सनीने तिच्या बॉलिवूड करिअरला गेल्या पाच वर्षांत खूप चांगल्या पद्धतीने शेपअप केले. तिच्यातील अभिनय क्षमता आणि त्याच्या परिसीमा यावर वादग्रस्त चर्चा घडू शकते, परंतु तिने ज्या पद्धतीने स्वत:चे स्थान निर्माण केले ते खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. चित्रपटांमध्ये लीडिंग लेडी म्हणून तिला कमी संधी मिळाल्या, मात्र ज्या काही भूमिका तिच्या वाट्याला आल्यात त्यामध्ये तिने बॉलिवूडकरांना हैराण करून सोडले हेही तेवढेच खरे आहे. कारण बॉलिवूडमधील दिग्गज सुपरस्टारदेखील त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यासाठी सनीची डिमांड करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सनीने आतापर्यंत दोन डझनपेक्षा अधिक चित्रपट केले. ज्यापैकी फक्त आठच चित्रपटांमध्ये ती लीड रोलमध्ये बघावयास मिळाली, मात्र अशातही तिच्या बºयाचशा भूमिका सुपरहिट ठरल्या. सनी आगामी काळात उमंग कुमार यांच्या ‘भूमी’ या चित्रपटात ‘ट्रिपी ट्रिपी’ या गाण्यावर थिरकताना बघावयास मिळणार आहे. या गाण्याला सचिन जिगर यांनी कंपोज केले आहे, तर कोरिओग्राफी गणेश आचार्य याची आहे. चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सनी जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात होती, तेव्हा संजूबाबा हा शो होस्ट करीत होता. त्याव्यतिरिक्त मिलन लूथरिया याच्या ‘बादशाहो’ या चित्रपटातही सनी ‘पिया मोरे’ या गाण्यात स्पेशल एपीयरेंस करणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत इमरान हाश्मीची हॉट केमिस्ट्री बघावयास मिळणार आहे. यावर्षी रिलीज झालेल्या सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’मध्ये सनी कॅमिओ करताना बघावयास मिळाली होती. यामध्ये ती रिअल लाइफ भूमिका साकारताना दिसली.त्याचबरोबर बॉलिवूडचा किंग शाहरूख खानच्या ‘रईस’मध्ये सनीने केलेल्या ‘लैला मैं लैला’ या गाण्याने तिला वेगळेच महत्त्व प्राप्त करून दिले. त्याचबरोबर ती पहिल्यांदा शाहरूखसोबत स्क्रिन शेअर करताना बघावयास मिळाली. २०१६ मध्ये आलेल्या ‘डोंगरी का राजा’ मध्येही सनी ‘चोली’ या ब्लॉकबस्टर गाण्यात स्पेशल एपीयरेंस करताना दिसली. या चित्रपटात रोनित रॉय आणि अश्मित पटेल यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याचबरोबर याचवर्षी आलेल्या ‘फुद्दू’ या चित्रपटातील ‘तू जरूरत नही जरूरी हैं’ या गाण्यात सनीचे ठुमके घायाळ करणारे होते. या चित्रपटातील स्टार कास्ट फारशी परिचित नव्हती. अशात सनीचे ठुमके प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले.२०१५ मध्ये आलेल्या अक्षयकुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’मध्ये सनी लिओनी सरप्राइजिंग कॅमिओ करताना दिसली. चित्रपटात एॅमी जॅक्सनने अक्षयसोबत भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये सनीने चार चित्रपटांमध्ये कॅमिओ केला. ज्यामध्ये एक तामिळ आणि एक तेलगू चित्रपट होते. तर ‘हेट स्टोरी-२’ आणि ‘बलविंदर सिंग फेमस हो गया’ यामध्ये तिचा कॅमिओ प्रभावी ठरला. २०१३ मध्ये सनी पहिल्यांदा ‘शूटआउट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात ‘लैला’ या गाण्यावर थिरकताना दिसली. एकूणच सनीचा हा पाच वर्षांचा प्रवास थक्क करणारा असला तरी, आगामी काळात यापेक्षा दर्जेदार चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकाराव्यात अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.