Join us  

श्रद्धा कपूरने सोडले मौन, 'स्ट्रीट डान्सर 3डी' साठी सोडला होता सायना नेहवालचा बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 2:55 PM

चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते.

गेल्या अनेक दिवसांपासून सायना नेहवाल बायोपिकची चर्चा होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा कपूरलाही अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र आजपर्यंत सायना नेहवाल बायोपिक अचानक का सोडला यावर श्रद्धाने कधीच स्पष्टीकरण दिले नव्हते. अखेर वारंवार होणा-या चर्चांमुळे श्रद्धाने आपले मौन सोडले आहे.

श्रद्धा कपूरने पहिल्यांदाच सायना नेहवाल बायोपिक सोडल्याचे कारण सांगितले आहे.  त्याचवेळी  रेमोने मला 'एबीसीडी 2'सारख्या सिनेमाची ऑफर दिली. त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडून मला 'स्ट्रीट डान्सर 3डी'ची ऑफर आली तेव्हा त्याच्या तारखा आणि सायना बायोपिकच्या तारखा जुळत नव्हत्या. त्यामुळे मी रेमोचा सिनेमा निवडत सायनाच्या बायोपिकला नकार दिला. मात्र याआधी दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने म्हटले होते की, चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण एखादा स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन.

त्यानुसार तिने मेहनतही केली, जेव्हा बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता तेव्हा यात श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेतही दिसली होती. मात्र अचानक काय झाले आणि श्रद्धाने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.  खरे तर या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री झाल्यापासूनच अनेक कुरबुरी सुरु होत्या. बायोपिकमध्ये श्रद्धाने सायनासारखे अगदी प्रोफेशनल प्लेअर दिसावे, असा सायनाचा अट्टाहास होता. पण काही दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये कुणी प्रोफेशनल प्लेअर बनेल, हे श्रद्धाला अशक्य वाटत होते. त्यामुळेच माझ्या कामाबद्दल समाधानी नसाल तर दुसरी सोय बघा, असे श्रद्धाने सांगून टाकले होते. अर्थात श्रद्धाचा हा पावित्रा बघून निर्माता- दिग्दर्शकचं नाही तर सायनाही नरमली होती. श्रद्धानंतर परिणीती चोप्राची वर्णी सिनेमात लागली होती.

टॅग्स :श्रद्धा कपूरसायना नेहवाल