तैमुरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅमवर अवरतली करिना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:22 IST
अभिनेत्री करिना कपूर लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅमवर उतरुन सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. व्हायट करलच्या ड्रेसमध्ये करिना खुपच ...
तैमुरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅमवर अवरतली करिना कपूर
अभिनेत्री करिना कपूर लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅमवर उतरुन सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. व्हायट करलच्या ड्रेसमध्ये करिना खुपच ब्युटिफुल दिसत होती. करिना कपूरच्या रॅमवॉकने लॅक्मे फॅशन वीकला चार चाँद लावले असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. करिना कपूर डिझायनर अनिता डोंगरची शो स्टॉपर होती. तैमूरच्या जन्मानंतर 45 दिवसांनी करिना रॅमवर अवतरली. या आधी ही करिनाने बेबी बंम्पसह रॅमवॉक करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. विंटर फेस्टिव्हलमध्ये ही करिनाने रॅमवॉक केले होते. त्यावेळी सब्याची मुखर्जींने डिझायन केलेला ड्रेस परिधान करुन रॅमवॉक केले होते. लॅक्मे फॅशन वीक दरम्यान रॅमवॉक करत करिनाने आपला आनंद व्यक्त केला. आई झाल्यानंतर 45 दिवसांनी रॅमवॉक करणे ही काही मोठी गोष्ट नसल्याचे यावेळी करिना म्हणाली. करिनाला रॅमवॉकसाठी विचारण्यात आला तेव्हा ती प्रचंड खूश झाल्याचे तिने सांगितले. रॅमवॉक करताना करिनाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. फॅशन शोच्या दरम्यान करिनाने व्हाइट कलरच्या ड्रेसवर तिने गोल्डन रंगाचे जॅकेट परिधान केले होते. करिनाचा मेकअॅप इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट डोनाल्ड शिमरॉकने केला होता. डोनाल्ड शिमरॉकने याआधी अनेक फेमस हॉलिवूड स्टारर्सच्या मेकअॅप केला आहे. ज्यात एशेले जड, किमकार्दशिया आणि किम कार्दशिंया ब्रिटनी स्पियर यांनी नाव सहभागी आहे.वीर दी वेडिंग या करिनाच्या आमागी चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरु होणार असल्याचे समजतयं. ज्यासाठी करिनाने तयारी पण सुरु केली असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी करिनाचा न्यू हेअर स्टाइलमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.