Join us

​‘रंगून’चे पहिले गाणे रिलीज : ‘ब्लडी हेल’मध्ये कंगनाचा लुक हंटरवालीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 20:09 IST

Rangoon first song released; kangana ranaut look like hanterwali ; या चित्रपटामध्ये कंगना एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी कंगनाने ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षी कंगनाला एका स्टुडिओमध्ये मर्लिन मॅनरोप्रमाणे हेअरकट व जवळपास तिच्यासारख्याचा लूकमध्ये दिसली होती.

कंगना रानौत, शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. रोमान्स आणि अ‍ॅक्शन असा सगळा मसाला असलेल्या चित्रटाचे गाणेही ‘ब्लडी हेल’ आगळे वेगळे ठरले आहे. या गाण्यात कंगनाचा हटके लूक पाहावयास मिळत आहे. ‘हंटरवाली’च्या रुपात ती चाहत्यांसमोर अवतरली आहे. गीताकार गुलजार यांनी हे गाणे लिहिले असून विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सुनिधी चौहानने गायलेल्या या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विशाल भारद्वाज आणि गुलजार ही गीतकार आणि संगीतकाराची जोडी एकत्र आली आहे. सोशल मीडियावरही सध्या या गाण्याचीच चर्चा सुरू आहे. या गाण्यात दाखविण्यात आलेल्या दृष्यांची झलक यापूर्वी ट्रेलरमधून दाखविण्यात आली असली तरी देखील हे गाणे अप्रतिम आहे. ‘ब्लडी हेल’ या गाण्यात कंगना लक्षवेधक ठरली आहे. हंटरवालीच्या स्वरूपात असणारी कंगना घोडेस्वारी करणारी, हातात हंटर घेऊन अनेकांच्या हृदयावर घाव घालणारी ठरते आहे. विशाल भारद्वाज यांचे चित्रपट वेगळ्या थाटणीचे असल्यामुळे या चित्रपटातून रसिकांना नवा अनुभव मिळणार आहे हे तेवढेच खरे. ‘रंगून’ची कथा १९४० च्या दशकातील असून, या चित्रपटाला द्वितीय महायुद्धाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये कंगना एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी कंगनाने ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षी कंगनाला एका स्टुडिओमध्ये मर्लिन मॅनरोप्रमाणे हेअरकट व जवळपास तिच्यासारख्याचा लूकमध्ये दिसली होती. तेव्हापासून तिचा हा लुक चांगलाच चर्चेत आला होता.