Join us

पहिली रेसिंग चॅम्पियन अलिशा आता आॅनस्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:19 IST

भारतात खेळामध्ये विशेषत: क्रिकेटला अधिक प्राधान्य आहे. या व्यतिरिक्त इतर खेळांना फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु इतर खेळांमधील ...

भारतात खेळामध्ये विशेषत: क्रिकेटला अधिक प्राधान्य आहे. या व्यतिरिक्त इतर खेळांना फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु इतर खेळांमधील खेळाडूही काही कमी नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चेन्नई येथील तरुण मुलगी अलिशा अब्दुल्लाह रेसिंगमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर आता बाहेरही मोठी कामगिरी बजावण्यास सज्ज झाली आहे. अलिशाने गो-कार्टिंगमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी केली. तिचे वडील आर. ए. अब्दुल्लाह हे नावाजलेले रेसर आहेत.वयाच्या ११ व्या वर्षी अलिशाने गो-कार्टिंगच्या साºया रेस जिंकल्या. वयाच्या १५ व्या वर्षी ती सुपर बाईक रेसिंगकडे वळाली. २००४ साली जे. के. टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियशनशीपमध्ये ती पहिल्या पाचमध्ये आली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्याकडे अधिक लक्ष दिले. २०१० साली दुचाकीचा अत्यंत भयंकर अपघात झाल्यानंतर ती चार चाकीकडे वळाली.याविषयी बोलताना अलिशा म्हणते, ‘हा सर्वथा पुरुषी खेळ आहे.  आपल्यासोबत एक मुलगी स्पर्धेला उतरत आहे, हे बºयाच जणांना पटत नव्हते. बºयाचवेळा ते मुद्दामहून माझ्या गाडीला धक्का देत. मी पुन्हा त्यांच्याशी लढायला तयार व्हायची. अपघातानंतर मी पुन्हा याकडे यायला तयार नव्हते. २०१४ साली तिने तमिळ चित्रपट इरुम्बु कुथिराई या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली. त्यानंतर भविष्यात तिला आणखी चांगली संधी आल्या. ‘तुमच्या मनात आल्यानंतर सारं काही होऊ शकतं. काही वेळा तुमची चेष्टा होऊ शकते, पण तुम्ही अधिक मजबुतीने पुढे येता, असे अलिशा आत्मविश्वासाने सांगते.