Join us

First Poster Out : काका-पुतण्याच्या ‘मुबारका’चा पहा फर्स्ट लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 22:38 IST

अभिनेता अर्जुन कपूर आणि अनिल कपूर या काका-पुतण्याच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. ...

अभिनेता अर्जुन कपूर आणि अनिल कपूर या काका-पुतण्याच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. पोस्टर बघून हा चित्रपट जबरदस्त कॉमेडीपट असेल यात शंका नाही. शिवाय चित्रपटात काका-पुतण्याची जुगलबंदी बघायला प्रेक्षकांना आवडेल असेच काहीसे चित्र दिसत आहे. पोस्टर बघून असे वाटत आहे की, प्रेक्षकांना बºयाच कालावधीनंतर एक चांगला कॉमेडीपट बघता येणार आहे. चित्रपटात काका-पुतण्याची केमिस्ट्री कशी रंगणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरचे लॉन्चिंग आयपीएलच्या फायनलप्रसंगी केले. यावेळी अनिल कपूर आणि अर्जुन कपूर दोघेही उपस्थित होते. यावेळी दोघांनी पुणे आणि मुंबई या दोन्ही संघांसाठी चिअरअप करी त्यांचा जोश वाढविला. दरम्यान, पोस्टरमध्ये अनिल कपूरसह तीन लोक दिसत आहेत. त्यातील दोघेजण अर्जुन आणि अनिल कपूर आहेत. पोस्टर बघितल्यानंतर हे स्पष्ट होते की, चित्रपटात अर्जुन कपूर डबल रोलमध्ये आहे. अनिस बाजमी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात या दोघांचा अंदाज बघण्यासारखा असणार आहे. अनीज यांनी ‘नो एंट्री’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या कॉमेडीपटांचे दिग्दर्शन केले आहे. अनिल कपूर हा त्यांचा आवडीचा अभिनेता असून, या चित्रपटात अथिया शेट्टी आणि इलियाना याही झळकणार आहेत. हा चित्रपट लग्नाच्या वातावरणावर आधारित आहे. काही क्षणांपूर्वीच अनिल कपूर याने ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. अनिल यांच्या फॅन्सकडून हे पोस्टर मोठ्या प्रमाणात बघितले जात असून, त्यास त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनिल कॉमेडी कलाकार म्हणूनदेखील यशस्वी झाले आहेत, अशात अर्जुन काय कमाल करणार हे बघणे मजेशीर असेल. हा चित्रपट २८ जुलैला रिलीज होणार आहे.