Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्देपीएम नरेंद्र मोदी २३ भाषांमध्ये होणार प्रदर्शित पीएम नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार विवेक ऑबेरॉय

बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे. त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होती. त्यात आता पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकच्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेकला ओळखता देखील येत नाही आहे. विवेकचा लूक हा हूबेहूब मोदींसारखा वाटत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मिळत आहे.

पीएम नरेंद्र मोदी २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ओमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या महिन्यातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात विवेक सोबत अभिनेते परेश रावलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिल्यानंतर या बायोपिकबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मोदींचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय