Join us

‘रेस-३’ मधील ‘MAIN MAN’चा फर्स्ट लूक आला समोर; सलमान खानने ट्विट करून केले कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:35 IST

आगामी ‘रेस-३’ या चित्रपटातील एक एक पात्राचा फर्स्ट लूक समोर येत आहे. सलमान, जॅकलीननंतर आता अभिनेता बॉबी देओलचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘रेस-३’ मधील ‘मेन मॅन’ बॉबी देओलचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. सिंकदर आणि जेसिका (सलमान आणि जॅकलीन फर्नांडिस) यांचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सलमान खानने आता ‘रेस-३’ परिवारातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला म्हणजेच बॉबी देओलला प्रेक्षकांसमोर आणले आहे. सलमानने गेल्या सोमवारीच चाहत्यांना ‘रेस-३’ परिवारातील एक-एक सदस्यांना तुमच्यासमोर आणणार असल्याचे वचन दिले होते. अशात आज त्याने सुपरस्टार बॉबी देओलच्या ‘यश’ या पात्राला सोशल मीडियाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केले आहे, ज्यास सलमानने ‘मुख्य व्यक्ती’ अशी उपाधी दिली आहे. बॉबीचे फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये "Yash: The Main Man. #Race3 #Race3ThisEid @thedeol @SKFilmsOfficial @TipsOfficial." असे लिहिले, तर बॉबी देओलने सोशल मीडियावर आपला परिचय देताना लिहिले की, सिंकदरने तुम्हाला ‘मेन मॅन’ असे संबोधल्याने ही रेस आणखी इंटरेस्टिंग झाली आहे. दिग्दर्शक रेमो डिसूजानेदेखील बॉबीच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, आपण सर्व ‘मेन मॅन’चा दरारा ऐकू शकतो. याव्यतिरिक्त साकिब सलीम, अनिल कपूर आणि चित्रपटाचे निर्माता रमेश तोरानी यांनीदेखील बॉबीच्या या पोस्टरवरून एक ट्विट केले आहे.  दरम्यान, बॉबी देओलने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याकरिता त्याला स्वत:मध्ये खूप बदलही करावे लागले. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत, त्यावरून याबाबतचा अंदाज बांधणे सहज शक्य होते. दरम्यान, ‘रेस-३’ची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच सलमान, जॅकलीन आणि आता बॉबीचा लूक समोर आल्याने सर्वांनाच चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. ‘रेस’ फ्रेंचाइजीच्या तिसºया भागात सलमान बघावयास मिळणार असल्याने चित्रपटात जबरदस्त तुफान बघावयास मिळणार आहे. ‘टायगर जिंदा है’च्या जरबदस्त यशानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा अ‍ॅक्शन अंदाज बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाची शूटिंग अबूधाबी येथे सुरू आहे. ज्याठिकाणी चित्रपटाची संपूर्ण कास्ट शूटिंगसाठी प्रयत्न करीत आहे. ‘रेस-३’मध्ये सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम बघावयास मिळणार आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.