Join us

First Look : अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’चे पहा पहिले पोस्टर; रिलीज डेटचीही केली घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:15 IST

आर. बाल्की यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही वेळापूर्वी रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता अक्षयकुमार अतिशय ...

आर. बाल्की यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही वेळापूर्वी रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता अक्षयकुमार अतिशय साध्या वेशभूषेत दिसत असून, सायकलवर आनंदी मूडमध्ये फेरफटका मारताना दिसत आहे. जर तुम्ही या पोस्टरचे निरीक्षण केल्यास, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की, सायकल चालविताना दोन हात वर केलेला अक्षय एवढा आनंदी का दिसत आहे? अक्षयचा हा चित्रपट १३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे, हेच त्याच्या आनंदामागचे कारण असून, रिलीजची तारीख स्पष्टपणे पोस्टरवर झळकत आहे.

हा चित्रपट अक्षयची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना प्रोड्यूस करीत आहे. चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयची लव्ह इंट्रेस्ट असेल. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारित आहे.

संपूर्ण चित्रपटादरम्यान सॅनेट्री नॅपकीन या संवेदनशील मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. 

दरम्यान, चित्रपटाचे पहिले पोस्टर ट्विंकल खन्ना हिनेच ट्विटच्या माध्यमातून रिलीज केले आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणाही केली आहे. ‘पॅडमॅन’ पुढच्यावर्षी १३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा आर. बाल्की यांनी लिहिली आहे. हा चित्रपट काहीसा वास्तविकतेवर आधारित आहे. कारण चित्रपटात अक्षयकुमार रियल लाइफ ‘पॅडमॅन’ मुरुगनाथम यांची भूमिका साकारणार आहे. ज्यांनी सर्वात स्वस्त सॅनेटरी पॅड्स बनविण्याचे काम केले आहे.