नवरात्रीमध्ये राणी पद्मावतीमधला दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक होणार लाँच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 13:20 IST
गेल्या अनेक दिवसांपासून संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आधी हा चित्रपट ...
नवरात्रीमध्ये राणी पद्मावतीमधला दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक होणार लाँच !
गेल्या अनेक दिवसांपासून संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता मात्र पोस्ट प्रॉडक्शन आणि चित्रपटाचे काही सीन्स बाकी असल्याने याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता या चित्रपटाशी संबंधीत आणखीन एक गोष्ट समोर येते आहे. संजय लीला भंसाळींच्या पद्मावती चित्रपटाचा फर्स्ट लूक या नवरात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि भन्साली प्रोडक्शन्सच्या पद्मावती चित्रपटाचे पहिले पोस्टर 21 सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाँच करण्यात येणार असल्याचे कळतंय आहे. नवरात्रीच्या घटस्थापनेची संपूर्ण देशभर सध्या तयारी सुरू आहे. आणि घटस्थापनेच्या दिवशीचं भन्सालींच्या राणी पद्मावतीचे रूप सर्वांसमोर येणार आहे. याची उत्सुकता गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांना आहे. अखेर तो क्षण जवळ आला आहे. पद्मावती चित्रपट भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या कर्तृत्वाचं प्रतिक आहे. त्यामुळे नवरात्रीला देवीच्या स्थापनेच्या शुभ प्रसंगी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज होणार आहे. पद्मावती चित्रपटात आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दृश्यात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव हे पद्मावतीचे वैशिष्ट्य असेल. संजय लीला भन्साली याविषयी सांगतात, “राणी पद्मावतीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या चित्रपटाचा फर्स्टलूक घेऊन आम्ही येतोय. आणि नवरात्रौत्सव साजरा करतोय.”ALSO READ : Don't miss : ‘पद्मावती’बद्दल आहे एक ‘लार्जर देन लाईफ’ बातमी!!यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी शाहिदने सहा प्रकारच्या तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. या चिपटात काम करण्यासाठी दीपिका आणि शाहिदला 11 कोटी तर रणवीर सिंग ला 13 कोटींचे मानधन देण्यात आले आहे. पद्मावती हा संजय लीला भन्साळी यांचा बिग बजेट आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे.