Join us

संयामीला पहिल्याच चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 15:52 IST

मोठ्या बॅनरच्या पहिल्याच ‘मिर्झिया’ या चित्रपटात छाप सोडणाºया संयामी खेरने पदार्पणातच फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅँड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. ...

मोठ्या बॅनरच्या पहिल्याच ‘मिर्झिया’ या चित्रपटात छाप सोडणाºया संयामी खेरने पदार्पणातच फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅँड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. फिल्मफेअर अवॉर्डसचा सोहळा नुकताच मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. त्यात बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, अलिया भट, जॅकलीन फर्नांडीस यांच्याबरोबरीने संयामीला स्थान मिळाले. बरोबरच इमर्जिंग फेस अ‍ॅँड फॅशन इन बॉलिवूड म्हणून संयामीचा विशेष उल्लेख करण्यात आला. मूळ नाशिककर असलेल्या संयामीला राकेश मेहरांच्या प्रॉडक्शनचा पहिलाच मिर्झिया चित्रपट मिळाला. स्टार पुत्र हर्षवर्धन कपूर बरोबरचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिश्मा दाखवू शकला नसला तरी चित्रपट समीक्षकांनी संयामीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. करण जोहर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिर्झियातील भूमिकेनिमित्ताने खास ट्वीट करून संयामीचे कौतुक केले आहे.