अखेर शाहरुखने ‘लिंक अप्स’बद्दल तोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 10:14 IST
ब्रॅड पिट आणि टॉम कु्रझपेक्षा जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या किंग खानचे अधुनमधून कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीसोबत नाव जोडले जाते. ...
अखेर शाहरुखने ‘लिंक अप्स’बद्दल तोडले मौन
ब्रॅड पिट आणि टॉम कु्रझपेक्षा जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या किंग खानचे अधुनमधून कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीसोबत नाव जोडले जाते. आता मनोरंजन विश्वात स्टार्सचे लिंक-अप व ब्रेक-अपच्या बातम्या येतच असतात. परंतु अशा बातम्यांचा त्याच्या जोडीदारावर कसा परिणाम होत असेल याचा विचार कधी केला ?शाहरुखने एका मुलाखतीमध्ये पत्नी गौरीला त्याच्या लिंक-अप्सबद्दल काय वाटते याचा खुलासा केला. तो म्हणाला की, ‘ गेली दोन दशके मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. फिल्मी दुनियेत तर ग्लॅमरशी संबंध येणारच. मी जगातील सर्वात सुंदर महिलांसोबत काम करतो म्हटल्यावर माझे नाव कोणाशी तरी जोडले जाणारच. याची गौरीला पूर्ण कल्पना आहे. मुळात आमचा एकमेकांवर असणारा विश्वास आमच्या मजबुत नात्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मीडियामध्ये येणाऱ्या माझ्या लिंक-अपच्या अफवांवर ती विश्वास ठेवत नाही.मध्यंतरी शाहरुख आणि प्रियांका चोपडा यांच्या अफेयरची जोरदार चर्चा होती. एवढेच काय तर गौरीने त्याला प्रियांकाशी काम न करण्याचे अल्टिमेटमच दिले होते. या वादात त्याचा ब्रेस्ट फ्रेंड करण जोहरनेदेखील गौरीची बाजू घेतली होती. त्यामुळे दोघांमध्ये काही काळासाठी कटुता आल्याचेसुद्धा बोलले जात होते. शाहरुख - गौरीपण अद्यापही शाहरुख-गौरीचे नाते शाबूत असून त्यांच्यामध्ये कधीच दुरावा येऊ नये अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता शाहरुखने प्रथमच त्याच्या लिंक-अपबद्दल वाच्यता केल्यामुळे अनेकजणांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सध्या शाहरुख इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असून पुढील महिन्यात आलिया भटसोबत त्याचा गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचे टिझर प्रदर्शित करण्यात आले.