Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रेग्नेंसीबाबत अनुष्का शर्माने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 20:03 IST

अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले नाही तर अनुष्का गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अनुष्का शर्माविराट कोहली हे दोघे गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले नाही तर अनुष्का गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेला अखेर पूर्णविराम देत अनुष्काने मौन सोडले आहे. 

झिरो चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनुष्काला अनेकांनी तिला प्रेग्नेंट असल्याबाबत विचारले. मात्र अनुष्काने या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत गर्भवती नसल्याचे स्पष्ट केले. मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मला अन्य कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. काही वर्ष मी करिअरवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळे गर्भवती असल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत, असे अनुष्काने सांगितले. तसेच विराट आणि मी लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच कामाला सुरूवात केली. आमच्या दोघांचंही वेळापत्रक खूपच व्यग्र असते त्यामुळे आम्हाला एकमेकांना म्हणावा तेवढा वेळही देता येत नाही असेही तिने सांगितले. 

 

'झिरो' चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.  यापूवीर्ही अनेक चित्रपटात याच तंत्राचा वापर करून लहानाला मोठे आणि मोठ्याला लहान दाखवण्यात आले आहे. यात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माझिरो सिनेमाविराट कोहली