Join us

​अखेर सलमानच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुष्का बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 21:49 IST

‘सुलतान’साठी आखाड्यातील दृश्य साकारताना एखाद्या बलात्कारित पीडित मुलीची  अवस्था व्हावी, तशी माझी अवस्था झाली होती, या सलमान खानच्या वक्तव्यावरून ...

‘सुलतान’साठी आखाड्यातील दृश्य साकारताना एखाद्या बलात्कारित पीडित मुलीची  अवस्था व्हावी, तशी माझी अवस्था झाली होती, या सलमान खानच्या वक्तव्यावरून बराच वाद झाला. सलमानच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इतक्या की, सलमानचे पिता सलीम खान यांना सलमानच्या वतीने माफी मागावी लागली होती. आमीर खानचे हे वक्तव्य दुर्दैवी होते, अशी प्रतिक्रिया बी-टाऊनमधील काही सेलिब्रिटींनी दिली तर अनेकांनी डिप्लोमॅटीक उत्तर देऊन वेळ मारून नेली. ‘सुलतान’मध्ये सलमानची को-स्टार असलेल्या अनुष्का शर्मालाही सलमानच्या वक्तव्याबाबत विचारले गेले होते. मात्र अनुष्काने यावर सोईस्कर मौन धारण केले होते. पण अखेर अनुष्काने आपली चुप्पी सोडली. अर्थात तिनेही सलमानविरोधात जायचे टाळलेच आणि अनेकांसारखीच डिप्लोमॅटीक प्रतिक्रिया दिली. सलमानच्या या वादावरून मला एकच गोष्ट कळते, ते म्हणजे बोलताना आपला आपल्या जिभेवर ताबा असायला हवा. मी तरी यातून हेच शिकले, असे अनुष्का म्हणाली. सलमानने या वादाबद्दल माफी मागायला हवी का, असा प्रश्न अनुष्काला केला असता तिने काय उत्तर दिले माहितीय?? मी सलमानला पूर्णपणे ओळखत नाही. मी त्याच्यासोबत केवळ एकच चित्रपट केला आहे. त्यामुळेच मी याबाबत काही सांगू शकत नाही शिवाय याबद्दल आमचे काही बोलणेही झाले नाही, असे ती म्हणाली...व्वा, मान गयें अनुष्का!!