इंदिरा हत्याकांडावर आधारीत चित्रपटाला अखेर मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 12:19 IST
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्यावर आधारित असलेल्या ‘३१ अक्तूबर’ या चित्रपटातील काही दृश्ये वगळून, चार महिन्यानंतर सेन्सार बोर्डाने ...
इंदिरा हत्याकांडावर आधारीत चित्रपटाला अखेर मान्यता
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्यावर आधारित असलेल्या ‘३१ अक्तूबर’ या चित्रपटातील काही दृश्ये वगळून, चार महिन्यानंतर सेन्सार बोर्डाने अखेर मान्यता दिली आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणून सोहा अली खान तर अभिनेता वीर दास यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता शिवाजी लोटन पाटीलने याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपटा इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच्या घटनेवर आधारीत आहे. हैरी सचदेवा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हिंसेसह काही दृश्ये यामधून वगळण्यात आले आहेत. चित्रपट निर्माता सचदेव म्हणाले की, मान्यता मिळण्यासाठी मोठा विलंब लागला परंतु, चित्रपटाच्या कथेला जी इमानदारी आवश्यक होती. ती दृश्ये ठेवण्यासाठी आही यशस्वी ठरलो आहोत. वाद उत्पन्न होतील, असे दृश्ये यामधून वगळण्यात आले आहेत.