तुषार कपूरने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी या दिग्दर्शकाकडे गिरवले होते दिग्दर्शनाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:17 IST
तुषार कपूरने गेल्या काही वर्षांत एक अभिनेता म्हणून त्याची एक वेगळी जागा बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. तुषारचे नायक म्हणून ...
तुषार कपूरने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी या दिग्दर्शकाकडे गिरवले होते दिग्दर्शनाचे धडे
तुषार कपूरने गेल्या काही वर्षांत एक अभिनेता म्हणून त्याची एक वेगळी जागा बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. तुषारचे नायक म्हणून फारच कमी चित्रपट गाजले असले तरी साहाय्यक अभिनेता म्हणून त्यांने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोलमाल या चित्रपटांच्या सिरिजमध्ये तुषारने साकारलेली मुक्याची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. गोलमाल अगेन हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील तुषारचे काम सगळ्यांना आवडले होते. या चित्रपटाने २०० कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. तुषारने मुझे कुछ कहना है या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात करिना कपूरसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात तुषार आणि करिना हे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे त्यांची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाली होती आणि या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा देखील झाली होती. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले. त्याने क्या कूल है हम, क्या सुपर कूल है हम या अॅडल्ट कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुषार कपूर हा अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा असल्याने त्याच्यासाठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हे अतिशय सोपे होते. त्याच्याआधी त्याची बहीण एकता कपूरने एक निर्माती म्हणून छोट्या पडद्यावर प्रस्थ निर्माण केले होते. या सगळ्यामुळे तुषारला चित्रपटसृष्टीत काम करण्याचा रस आहे हे निर्मात्यांना कळल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून तुषारने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्याला सगळ्या तांत्रिक गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. त्यामुळे तुषार कपूरने अनेक वर्षं दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याकडे दिग्दर्शनाचे धडे गिरवले. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यामुळे भविष्यात तुषार आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसला तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही. Also Read : एकता कपूरने विद्या बालनला या अभिनेत्यासह लग्न करण्याची गळ घातली होती?