Join us

फिल्मफेयर अवॉर्ड्स नॉमिनेशन: सलमान-शाहरुख-आमिरपैकी कोण मारणार बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:54 IST

बॉलीवूडमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ची नामांकने जाहीर करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात ...

बॉलीवूडमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ची नामांकने जाहीर करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात बऱ्याच वर्षांनंतर तिन्ही खान ‘बेस्ट अ‍ॅक्टर’च्या स्पर्धेत आहेत.सलमान खान ‘सुल्तान’मधील पहेलवानाच्या भूमिकेसाठी, शाहरुख खान ‘फॅन’मधील जबरा अभिनयासाठी तर आमिर ‘दंगल’मध्ये महावीर फोगट यांचे जीवन साकारण्यासाठी नामांकित आहे. आता बाजी कोण मारणार हे तर १४ तारखेलाच कळेल.अभिनेत्रीमध्ये आलिया भट्टला ‘डिअर जिंदगी’ आणि ‘उडता पंजाब’ अशा दोन चित्रपटांसाठी नामांकन मिळाले आहे. यावेळी तिची स्पर्धा विद्या बालन (कहाणी २), सोनम कपूर (नीरजा), अनुष्का शर्मा (ऐ दिल है मुश्कील), ऐश्वर्या राय-बच्चन (सरबजीत) यांच्याशी आहे. यामध्ये खरी टस्सल सोनम आणि आलियामध्ये आहे एवढे मात्र नक्की.वर्षभर ज्याचा नावाचा खूप ‘बोलबाला’ झाला त्या फवाद खानलादेखील ‘कपूर अँड सन्स’मधील भूमिके साठी सर्वोत्कृ ष्ट सहअभिनेत्याचे नॉमिनेशन मिळाले आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटासाठी ऋषी कपूर आणि रजत कपूर हेसुद्धा याच विभागात नामांकित आहेत. म्हणजे या तिघांमध्ये कोण सरस ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. यावेळी अक्षयकुमारला पूर्णपणे डावलण्यात आल्याचे दिसते. ‘रुस्तम’लादेखील कोणतेच नॉमिनेशन नाही.नामांकनाची संपूर्ण यादी :बेस्ट फिल्मदंगलकपूर अँड सन्सनीरजापिंकसुल्तानउडता पंजाब
बेस्ट अ‍ॅक्टरआमिर खान - दंगलअमिताभ बच्चन - पिंकरणबीर कपूर - ऐ दिल है मुश्किलसलमान खान - सुल्तानशाहरुख खान - फॅनशाहिद कपूर - उडता पंजाबसुशांतसिंग राजपूत - एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी
बेस्ट अ‍ॅक्ट्रेसऐश्वर्या राय-बच्चन - सरबजीतआलिया भट्ट - डिअर जिंदगीआलिया भट्ट - उडता पंजाबअनुष्का शर्मा - ऐ दिल है मुश्किलसोनम कपूर - नीरजाविद्या बालन - कहानी २
बेस्ट दिग्दर्शकअभिषेक चौबे - उडता पंजाबअली अब्बास जफर - सुल्तानकरण जोहर - ऐ दिल है मुश्किलनितेश तिवारी - दंगलराम माधवानी - नीरजशकुन बत्रा - कपूर अँड सन्स
बेस्ट म्युझिकअमाल मलिक, बादशाह, अर्को, तनिष्क बगची, बेनी दयाल आणि न्युक्लिया - कपूर अँड सन्सअमित त्रिवेदी - उडता पंजाबमीत ब्रदर्स, अमाल मलिक, अंकित तिवारी आणि मंज म्युसिक - बागीप्रितम - ऐ दिल है मुश्किलशंकर, एहसान, लॉय - मिर्झियाविशाल-शेखर - सुल्तान