Join us  

Filmfare Awards 2024 : शबाना आझमींच्या 'त्या' किसिंग सीनची झाली चर्चा; अन् त्याच सिनेमासाठी मिळाला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:07 AM

Filmfare Awards 2024: अभिनेता विकी कौशल यानेही या पुरस्कार सोहळ्यात त्याची मोहर उमटवली आहे.

Filmfare Awards2024:  नुकताच गुजरातमध्ये 69 th Filmfare Awards पुरस्कार सोहळा पार पडला. मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दोन दिवस चाललेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

गुजरातच्या गांधीनगर येथे फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी बाजी मारली. यात खासकरुन animal, सॅम बहादूर, जवान या सिनेमांनी घवघवीत यश संपादन केलं. इतंकच नाही तर, मनोज बाजपेयी, अक्षय कुमार, विक्रांत मेस्सी ही कलाकार मंडळी सुद्धा मागे नव्हते.

सर्वोत्कृष्ट कथानक या विभागात अभिनेता मनोज बाजपेयी याच्या जोरम आणि अक्षय कुमारचा OMG 2 या सिनेमांनी बाजी मारली आहे. तर, सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्लेसाठी विधू विनोद चोप्रा यांच्या 12 वी फेल या सिनेमाला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.

69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात संदीप रेड्डी वांगा यांच्या Animal या सिनेमाने सुद्धा स्थान पटकावलं आहे. Animal च्या सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमसाठी प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वज, श्रेयस पुराणिक, भूपिंदर बब्बल यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या सिनेमाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्टदेखील उपस्थित होते.

animal च्या 'अर्जन वेल्ली' या गाण्यासाठी भूपिंदर बब्बल याला पुरुष वर्गात सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर महिला वर्गात शिल्पा राव हिला 'पठाण' सिनेमातील 'बेशर्म रंग' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आलंयबॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी सुद्धा या पुरस्कार सोहळ्यात मागे नव्हत्या. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून त्या पुन्हा एकदा पडद्यावर झळकल्या. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर, अभिनेता विकी कौशल याला 'डंकी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला.

दरम्यान, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सलमान खानची भाजी अली झे अग्निहोत्री ही चर्चेचा विषय ठरली. फर्रे सिनेमासाठी तिला महिला वर्गात सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळा. तर, पुरुष वर्गात आदित्य रावल याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. त्याने फराज या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डबॉलिवूडशबाना आझमीसेलिब्रिटीरणबीर कपूरआलिया भट