एकही नामवंत कलाकाराशिवाय फराह बनवितेय चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:25 IST
नेहमी नामवंत कलाकारांना घेऊन चित्रपट बनविणारी दिग्दर्शिका फराह खान तिचा आगामी चित्रपट एकही प्रसिद्ध कलाकाराला न घेता बनविणार आहे. ...
एकही नामवंत कलाकाराशिवाय फराह बनवितेय चित्रपट
नेहमी नामवंत कलाकारांना घेऊन चित्रपट बनविणारी दिग्दर्शिका फराह खान तिचा आगामी चित्रपट एकही प्रसिद्ध कलाकाराला न घेता बनविणार आहे. ती मुलींच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार आहे. याबाबत फराहने खुलासा केला की, ‘मी पटकथा लिहिली आहे. यात एकही नामवंत कलाकार असणार नाही. दोन मुलींच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. यात मला प्रसिध्द असलेला कलाकार घ्यायचा नाही.’ती पुढे म्हणाली, ‘मला १०० कोटीवाला चित्रपट बनवणे सोपे होते. पण २० कोटीचे बजेट असलेल्या या चित्रपटासाठी वेळ लागत आहे कारण यात मोठा कलाकार नाही.’फराहने आतापर्यंत 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि 'हैप्पी न्यू इयर' यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यात मोठ्या नामवंत कलाकारांचा समावेश होता.