Join us  

 ‘कलंक’साठी लाहोरपर्यंत गेले होते यश जोहर! असे आहे ‘पाकिस्तान कनेक्शन’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:32 PM

तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते.

ठळक मुद्देआधी ‘कलंक’ची स्टारकास्ट एकदम वेगळी होती. करण जोहर या चित्रपटात शाहरूख खान, काजोल, अजय देवगण व राणी मुखर्जीला कास्ट करू इच्छित होता.

यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कलंक’ येत्या बुधवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे.  वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या मल्टिस्टारर चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. या चित्रपटासाठी यश जोहर यांनी बराच रिसर्च केला होता. अगदी पाकिस्तानाही ते गेले होते. 

‘कलंक’ या चित्रपटात १९४० च्या दशकातील एक कथा दाखवली गेली आहे.  हिंदू-मुस्लिम अशा दोन कुटुंबाची कथा यात पाहायला मिळणार आहे. यश जोहर यांना ही कथा अतिशय सशक्तपणे पडद्यावर साकारायची होती. त्यांनी या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू केले होते. पण काही कारणास्तव हा चित्रपट थंडबस्त्यात गेला. तथापि चित्रपट वास्तववादी असावा, याबद्दल यश जोहर आग्रही होते आणि त्याचमुळे  १९४० हे दशक आणि या दशकातील पाकिस्तान कसा होता, हे जाणून घेण्यासाठी यश जोहर लाहोरला गेले होते. करण जोहरने आपल्या ‘’  या बायोग्राफीत याचा उल्लेख केला आहे.

चर्चा खरी मानाल तर, आधी ‘कलंक’ची स्टारकास्ट एकदम वेगळी होती. करण जोहर या चित्रपटात शाहरूख खान, काजोल, अजय देवगण व राणी मुखर्जीला कास्ट करू इच्छित होता. पण ही स्टारकास्ट  फायनल होऊ शकली नाही. यानंतर करणने शाहरूख व रणबीर कपूरला घेऊन हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. पण त्याचा हा प्लानही फसला. अखेर आलिया, वरूण, संजय, माधुरी, सोनाक्षी व आदित्यला घेऊन करणने हा चित्रपट बनवला आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

टॅग्स :करण जोहरकलंकयश जोहरआलिया भटवरूण धवन