Join us  

"ताजमहल प्यार की निशानी है, तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है," 'भुज'मधील रक्त सळसळवणारे डायलॉग्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 4:05 PM

Bhuj: The Pride Of India : या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा सैनिकाच्या भूमिकेत चाहत्यांना खूश करताना दिसत आहे. तर संजय दत्तची भूमिकाही सर्वांनाच इंप्रेस करणारी आहे.

मुंबई - बॉलीवुड स्टार अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चे (Bhuj Trailer Dialogues) ट्रेलर रिलीज झाले आहे. चित्रपटाचे ट्रेलर जबरदस्त अॅक्शन सीनने सुरू होते आणि शेवटपर्यंत पापण्या लावण्याचीही इच्छा होत नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातील डायलॉग्स एका चडी एक आहेत. हे डायलॉग्स ऐकल्यानंतर तुमचेही रक्त सळसळल्या शिवाय राहणार नाही. (Film Bhuj the pride of india most fascinating dialogues)

या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा सैनिकाच्या भूमिकेत चाहत्यांना खूश करताना दिसत आहे. तर संजय दत्तची भूमिकाही सर्वांनाच इंप्रेस करणारी आहे.

असे आहेत चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही जबरदस्त डायलॉग्स -

  •  मराठा सिर्फ दो ही बात जानता है- मारना या मरना
  • कबीरा, क्यों जंग का ऐलान है... आज खुदा भी परेशान है
  • ताजमहल प्यार की निशानी है... तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है
  • या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना... मै रहूं या ना रहूं, मेरे हिंदुस्तान को सलामत रखना
  • है लिए हथियार दुश्मन ताख में बैठा उधर... और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर...
  • खून से खेलेंगे होली अगर वतन मुश्किल में है... सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है...
  • जब तक सूरज चंदा चमके... तब तक ये हिंदुस्तान रहे
  • और इसी हिंदुस्तान के लिए हमें लडना है... और अगर जरूरत पडी को बलिदान देना है...
  • जिस दिन लडाई जीतूंगा, उसी दिन पगडी पहनूंगा
  • मेरे मरने का मातम मत करना... मैंने खुद ही शहादत चुनी -है... मैं जीता हूं मरने के लिए... मेरा नाम है सिपाही

केव्हा प्रदर्शित होणार चित्रपट -हा चित्रपट 13 ऑगस्टला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच आले असून यात अजय देवगनचा दमदार आवाजही ऐकायला येत आहे. अजय देवगनने ज्या पद्धतीने डायलॉग म्हटला आहे, त्यावर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. या ट्रेलरमध्ये नोरा फतेही, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगन दिसत आहेत. हे चौघेही आपापल्या भूमिकेत जबरदस्त दिसत आहेत. टिझर पाहूनच, हा चित्रपट सुपरहिट होणार असल्याची कल्पना येते. 

टॅग्स :बॉलिवूडअजय देवगणनोरा फतेहीसोनाक्षी सिन्हासंजय दत्त