Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर घराण्याची पाचवी पिढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:09 IST

करिश्मा कपूरची मुलगी समैराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १0 वर्षांची समैरा ही कपूर घराण्यातील पाचवी पिढी आहे, जी चित्रपट ...

करिश्मा कपूरची मुलगी समैराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १0 वर्षांची समैरा ही कपूर घराण्यातील पाचवी पिढी आहे, जी चित्रपट सृष्टीमध्ये आली आहे. बी हॅपी नावाची शॉर्ट फिल्म समैराने केली असून, १९ व्या आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात आले. हा लघुपट लिटल डायरेक्टर्स या कॅटेगिरीत फेस्टिव्हलमध्ये सहभागी करण्यात आला होता. समैराने तिचे अभिनय कौशल्य यात दाखविले असून, सिनेमाटोग्राफरचीही जबाबदारीही तिने सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर स्क्रीप्ट लिहिण्यासह संपादन करण्यातही तिने सहभाग घेतल्याचे समजते. समैराबरोबरच सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम आणि शेखर कपूरची मुलगी कावेरी यांनी देखील हा लघुपट बनविण्यासाठी मदत केली आहे. करिश्मा कपूर आणि तिची बहीण करिना कपूर यांनी समैरासोबत नुकताच हा चित्रपट पाहिला आहे.