Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘गोलमाल ४’ साठी श्रद्धाने वाढवली फी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 13:58 IST

‘गोलमाल’सीरीज प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करतेय. गोलमालच्या तीनही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता लवकरच ‘ गोलमाल ४ ’ हा सीरीजचा ...

‘गोलमाल’सीरीज प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करतेय. गोलमालच्या तीनही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता लवकरच ‘गोलमाल ४’ हा सीरीजचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गोलमाल’च्या टीममध्ये कोणती अभिनेत्री दिसणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांचे नाव ‘गोलमाल ४’ साठी चर्चेत होते. पण, आता श्रद्धा कपूरने तिची फी वाढवून १.५ कोटी केल्याने ती या ‘गोलमाल’ टीममध्ये दिसेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपटाचे निर्माते केवळ १ कोटी रूपयांपर्यंतच फी देऊ शकतात. म्हणून तिच्या अटी कितपत मान्य होतील, ही शंकाच आहे.‘रॉक आॅन २’ दणकून आपटल्यानंतरही श्रद्धा कपूरच्या तिच्या फीविषयीच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे जाणवतेय. निर्माते तिला केवळ १ कोटी रूपयेच फी म्हणून देऊ शकतात. पण तिने ती वाढवून १.५ कोटी केली आहे. ‘गोलमाल’ सारख्या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेण्याअगोदर तिने एकदा तरी विचार करावा असे अपेक्षित आहे. मात्र, तिचा हा पवित्रा चित्रपटात दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात यावे असे सुचवण्यासारखा आहे. त्यामुळे कदाचित परिणीती चोप्रा ‘गोलमाल ४’ मध्ये दिसण्याची शक्यता बळावली आहे.परिणीती सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची शूटिंग करते आहे. तिने आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण, कॉमेडी चित्रपटात भूमिका करण्याचे तिचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. ‘गोलमाल ४’ च्या निमित्ताने ते पूर्ण होईल यात काही शंका नाही. त्याचबरोबर तिच्या सुशांतसिंग राजपूतसोबतच्या ‘ताकादुम’ चित्रपटाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे कळतेय.