Join us

अपयशाला घाबरते आलिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:56 IST

बॉलिवूडला ‘बॅक टू बॅक’ हिट्स चित्रपट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट म्हणतेय, ‘ मी अपयशाला घाबरते! ’ थोडंसं विचित्र वाटतं ...

बॉलिवूडला ‘बॅक टू बॅक’ हिट्स चित्रपट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट म्हणतेय, ‘ मी अपयशाला घाबरते! ’ थोडंसं विचित्र वाटतं ना? पण होय, हे अगदी खरे आहे. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलियाने विविधांगी भूमिका करून बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे. चित्रपटांसोबतच तिची फॅन फॉलोर्इंग देखील वाढत आहे. पण, तरीही ती या जगात अपयशाला सर्वांत जास्त घाबरते, असे तिने नुकतेच चाहत्यांसोबत ट्विटरवर शेअर केले आहे.                            आलिया भट्ट तिच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर असताना तिने तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठे गुपित लाडक्या चाहत्यांसमोर ठेवले आहे. ती म्हणते,‘ माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला स्पर्धा करायला प्रचंड आवडतं. मी चौथीत असल्यापासून मला अपयशाची प्रचंड भीती वाटते. शाळेत असताना मी पुस्तक डोक्यावर संतुुलन करण्याच्या स्पर्धेतून बाद झाले होते. तेव्हापासून अपयशाची भीती माझ्या मनात घर करून राहिलीय. तेव्हा मी खूप दु:खी होते की, मला ती स्पर्धा जिंकता आली नाही. मी माझ्या मनाला समजावलं की, ती पुस्तक संतुलन करण्याची मूर्ख स्पर्धा होती. पण, तरीही त्या स्पर्धेचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. आताही मला चित्रपटाला अपयश मिळाले तर प्रचंड त्रास होतो.’                           ‘डिअर जिंदगी’ मध्ये एका सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत असलेली आलिया भट्ट तिच्या त्यातील परफॉर्मन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा निरागस पण भूमिका समजून घेणारा अभिनय ‘बी टाऊन’ च्याही चर्चेचा मुद्दा बनतोय. मात्र, अपयशाला घाबरण्याच्या तिच्या या अवगुणामुळे तिला करिअरमध्ये काही बाधा यायला नको, असे वाटतेय.