Join us  

सैफ अली खान व फातिमा सना शेखचा हॉररपट ‘तांत्रिक’चे बदलले नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:21 AM

सैफ व फातिमाच्या या चित्रपटाची घोषणा झाली, त्यावेळी त्याचे नाव ‘तांत्रिक’ ठेवण्यात आले होते. पण या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.

ठळक मुद्देगतवर्षी प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव व श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’सारखाच हा चित्रपटही हॉरर कॉमेडी आहे. आधी या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनचे नाव फायनल झाले होते. पण अचानक अभिषेकच्या जागी सैफची वर्णी लागली.

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख लवकरच सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या आगामी चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. सैफ व फातिमाच्या या चित्रपटाची घोषणा झाली, त्यावेळी त्याचे नाव ‘तांत्रिक’ ठेवण्यात आले होते. पण या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. होय, आता ‘भूत पुलिस’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘चोर पुलिस’ हे तर तुम्ही ऐकले असेल. यातचं थोडा बदल करत ‘भूत पुलिस’ असे या चित्रपटाचे नवे नामकरण करण्यात आले आहे. एका ताज्या मुलाखतीत खुद्द सैफने याचा खुलासा केला.

गतवर्षी प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव व श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’सारखाच हा चित्रपटही हॉरर कॉमेडी आहे. आधी या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनचे नाव फायनल झाले होते. पण अचानक अभिषेकच्या जागी सैफची वर्णी लागली. सैफ सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. ‘हंटर’ व ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ असे दोन मोठे सिनेमे त्याच्याकडे आहेत. पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवाला हिचा डेब्यू सिनेमा ‘जवानी जानेमन’ यातही सैफची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सुशांत सिंग राजपूत व संजना सांघी यांच्या ‘दिल बेचारा’ यातही सैफ झळकणार आहे. याशिवाय ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेबसीरिजच्या दुसºया सीझनचे शूटींगही तो करतोय.

फातिमाबद्दल सांगायचे तर ‘दंगल’नंतर ती ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दिसली. यानंतर लगेच तिला ‘भूत पुलिस’ हा चित्रपट मिळाला. याशिवाय अनुराग बसूच्या एका चित्रपटातही तिची वर्णी लागली. यात ती राजकुमार रावसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.

टॅग्स :सैफ अली खान फातिमा सना शेख