Join us

तीन वर्षांपासून या दुखण्याने बेजार होती ‘दंगल’ गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 14:00 IST

‘दंगल’ गर्ल गत तीन वर्षांपासून एका दुखण्याने बेजार झाली होती. असह्य वेदनांमुळे तिची झोप उडाली होती.

ठळक मुद्देफातिमाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला.  पैसे कमवण्यासाठी तिने फोटोग्राफीचेही काम केले होते.

‘दंगल’ या चित्रपटात गीता फोगटची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख गत तीन वर्षांपासून एका दुखण्याने बेजार झाली होती. असह्य वेदनांमुळे तिची झोप उडाली होती.  रोज रात्री ती वेदनने कण्हत असायची. पण गत तीन वर्षांत पहिल्यांदा तिची या वेदनांपासून सुटका झाली आणि ती शांत झोपू शकली.होय, फातिमाने तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांसोबत एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली.

‘गेल्या तीन वर्षांपासून मी खांद्याच्या दुखण्याने बेजार होते. अनेक उपचार केलेत पण व्यर्थ. रोज असह्य वेदना झेलत असताना एक दिवस मला डॉक्टर निलय शाह भेटले. त्यांच्या उपचारानंतर तीन वर्षांत पहिल्यांदा मी कुठल्याही वेदनेशिवाय शांत झोपू शकले,’ असे तिने लिहिले. शिवाय डॉक्टरांचे आभारही मानलेत.

फातिमाने ‘दंगल’ सिनेमात आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती व तिच्या भूमिकेची सगळीकडून खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर फातिमा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान, अमिताभ बच्चन व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

फातिमाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला.  पैसे कमवण्यासाठी तिने फोटोग्राफीचेही काम केले होते. अ‍ॅक्टींग करिअर सुरू होण्याआधी ती लग्न समारंभात जाऊन  फोटो काढायची. त्यातून तिची थोडी कमाई व्हायची. मात्र अभियक्षेत्रातील स्ट्रगलही तिने सुरूच ठेवला होता. फोटोग्राफीचे  काम सांभाळत तिने अभिनय क्षेत्राकडे लक्ष दिले आणि एक दिवस दिला ‘दंगल’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत फातिमाने आपल्या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली. आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. 

टॅग्स :फातिमा सना शेख