युलियासाठी भाई करतोय ‘फार्महाऊस’ रेडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 10:30 IST
पनवेल येथील फार्महाऊस सल्लूमियाँचे सर्वांत आवडते ठिकाण आहे. आता सलमान मुंबईच्या जवळच्या परिसरातील त्याच्या काही मालमत्तांचे जतन करतोय, असे ...
युलियासाठी भाई करतोय ‘फार्महाऊस’ रेडी!
पनवेल येथील फार्महाऊस सल्लूमियाँचे सर्वांत आवडते ठिकाण आहे. आता सलमान मुंबईच्या जवळच्या परिसरातील त्याच्या काही मालमत्तांचे जतन करतोय, असे कळते आहे. तसेच त्यांपैकी एक असलेल्या गोराई बीच येथील १०० एकर प्रॉपर्टीत तो ५ बीएचके बंगला बांधून घेतोय.वेल, आता हे काही सांगायला हवे का ? की हा बंगला तो कुणासाठी बांधतोय ते? त्याचे इतर ठिकाणी असलेल्या फार्महाऊस प्रमाणेच याचेही बांधकाम करण्याचे तो ठरवतो आहे. त्याने गोराई आणि मनोरी येथे मालमत्तेचे जतन के ले आहे.अधूनमधून तो तिथे बोटने जाणार असल्याचेही सांगतो. बॉलीवूडचे इतर सेलिब्रिटी यांचे साल्सेट आणि भेट कोस्टल रिजनमध्ये बंगले आहेत. सलमान त्याची रोमानियन गर्लफ्रेंड युलिया वंतुर हिच्यासोबत ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी याच ठिकाणी लग्न करणार आहे.