‘फ्लाइंग सिख’ नंतर फरहान अख्तर बनणार बॉक्सर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 16:03 IST
‘हाफ गर्लफ्रेण्ड’ नंतर मोहित सुरी दुसºया चित्रपटासाठी तयार असून, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. होय, मोहित ...
‘फ्लाइंग सिख’ नंतर फरहान अख्तर बनणार बॉक्सर!
‘हाफ गर्लफ्रेण्ड’ नंतर मोहित सुरी दुसºया चित्रपटासाठी तयार असून, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. होय, मोहित आता अभिनेता फरहान अख्तरला घेऊन चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मोहित फरहानसोबत पहिल्यांदाच काम करणार असून, वडील-मुलाच्या रिलेशनशिपवर हा चित्रपट आधारित असेल. तर चित्रपटाचा बॅकड्राप बॉक्सिंग असेल. त्यामुळे ‘भाग मिल्खा भाग’नंतर पुन्हा एकदा फरहान अशाच काहीशा दमदार भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. फरहानने ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे याही चित्रपटात तो काहीसा अशाच अंदाजात दिसणार आहे. चित्रपटात फरहान दोन एज ग्रुपमध्ये बघावयास मिळेल. ज्याकरिता त्याला त्याची बॉडी खूपच मेण्टेंड ठेवावी लागणार आहे. खरं तर अशाप्रकारच्या गोष्टीसाठी फरहान स्वत:च एवढा डेडिकेटेड असतो की, त्याची मेहनत चित्रपटात प्रकर्षाने दिसून येते. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये त्याने त्याच्या बॉडीवर बरेचसे एक्सपेरिमेंट केले होते. दरम्यान, मोहितने डीएनएला सांगितले की, फरहानने स्क्रिप्ट वाचल्यानंतरच या चित्रपटात काम करण्याचे ठरविले आहे. आता आम्ही दुसºया अभिनेत्याचा शोध घेत आहोत. चित्रपटाची कथा त्याच्या खासगी आयुष्याशी साम्य साधणारी आहे. लहानपणी आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनीच त्याचा सांभाळ केला असून, त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता चित्रपटाची टीम फरहानच्या मुलाची भूमिकेसाठी शोध घेत आहे. मोहितने ‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या रिलीजनंतर एक महिन्याचा ब्रेक घेतला होता. आता तो या चित्रपटासाठी पूर्णपणे तयार आहे. फरहान अख्तरविषयी बोलायचे झाल्यास त्याचा ‘रॉक आॅन २’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. तर मोहितचा ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे या चित्रपटातून दोघांनाही अपेक्षा आहेत. फरहान एक दमदार अभिनेता असून, त्याच्यात प्रचंड गुणवत्ता आहे. दरम्यान फरहान सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत; मात्र या दोघांचे नाते श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांना अजिबात पसंद नाही.