Join us

​फराह खानचा कूक परतला...! कदाचित त्याला तुम्हीही ओळखता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 11:41 IST

घरचे मदतनीस, स्वयंपाकी असे सगळे सुट्टीवर गेलेत की काय धांदल उडते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी सेलिब्रिटी सुद्धा याला ...

घरचे मदतनीस, स्वयंपाकी असे सगळे सुट्टीवर गेलेत की काय धांदल उडते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी सेलिब्रिटी सुद्धा याला अपवाद नाही. एखादा विश्वासू नोकर वा स्वयंपाकघराचा अख्खा ताबा आणि जीभेची चव सांभाळणारा कूक सुट्टीवर गेला की, सेलिब्रिटींनाही देव आठवतात. खरे वाटत नसेल तर फराह खानला विचारा. होय, कोरिओग्राफर, डायरेक्टर, अ‍ॅक्टर फराह खान हिला विचारा. आवडता कूक नसल्याने तिची काय गत झाली, हे तिलाच ठाऊक़ म्हणूनच तर हा कूक परत आला तेव्हा फराह आपला आनंद लपवू शकली नाही. तिने या कूकचे जंगी स्वागतचं केले नाही तर त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.‘माझा कूक आपल्या गावावरून परतला आहे. आता सगळे काही ठीक होईल,’ असे  tweet तिने केले आहे आणि या tweetसोबत कूकचा एक हसतानाचा फोटो शेअर केला आहे. फराहने शेअर केलेला हा फोटो पाहून याला कुठेतरी पाहिलेयं, असे तुम्हाला वाटतेयं का?  असे वाटत असेल तर तुम्ही बरोबर आहात. होय, हा कूक दुसरा कुणी नसून इंडियन आॅयडॉल(२००५)चा स्पर्धक आहे. होय, वसंत प्रजापती. तुम्ही अगदी अचूक ओळखलेत.वसंत हा पार्श्वगायक बनण्यासाठी मुंबईत आला होता. पण नशीबाने दगा दिला. त्याची ही इच्छा काही पूर्ण झाली नाही. पण पोट तर भरायचे. मग पोटासाठी त्याने  फराहच्या घरी कूकची नोकरी पत्करली. वसंत झारखंडचा राहणारा आहे. आजही तो संगीताची रियाज चुकवत नाही. म्हणजेच अद्यापही सिंगर बनण्याची त्याची आशा मावळलेली नाही. वसंत अलीकडे आपल्या गावी गेला होता. निश्चितपणे तो गावी गेल्याने फराहच्या स्वंयपाकघरातील जेवणाची चव बिघडली होती. त्यामुळेच वसंत परत आल्याने फराहला इतका आनंद झाला.ALSO READ: शाहरूख खानने ट्विट करून फराह खानला म्हटले, ‘तू माझे शोषण केले’!फराह खान गत १० नोव्हेंबरला दीपिका पादुकोण व निर्माता दिनेश विजनसोबत तिरूमाला तिरूपतीच्या दर्शनाससठी गेली होती. त्यापूर्वी ८ नोव्हेंबरला ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फराहने चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला होता. या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झालीत, विश्वास बसत नाहीयं...असे तिने लिहिले होते.