Join us

फराह खानने आजपर्यंत गोविंदाला केलं नाही कोरिओग्राफ, तिनेच सांगितलं याचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 17:53 IST

नुकतेच दोघे एका शोधमद्ये सोबत दिसले. दोघांनी आजपर्यंत एकत्र काम का केलं नाही, याचा खुलासा फराह खानने केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) एका शानदार स्टार आहे. अभिनयासोबतच तो एक जबरदस्त डान्सरही आहे. बॉलिवूडच्या अनेक कोरिओग्राफर्सनी चीची म्हणजे गोविंदासोबत काम केलं आहे. पण फराह खान (Farah Khan) एक अशी कोरिओग्राफर आहे, जिने गोविंदाला कधीच कोरिओग्राफ केलं नाही. नुकतेच दोघे एका शोधमद्ये सोबत दिसले. दोघांनी आजपर्यंत एकत्र काम का केलं नाही, याचा खुलासा फराह खानने केला आहे. 

काय म्हणाली फराह?

फराह खान म्हणाली की, 'आज माझं जीवन मला पूर्ण वाटतं.  ३० वर्षांनंतर मी गोविंदासोबत डान्स केला. मी आज सर्वांना एक सीक्रेट सांगते. गोविंदा माझा बालपणीचा मित्र आहे. पण मी आजपर्यंत त्याला कोरिओग्राफ केलं नाही. त्याला कोरिओग्राफ करण्याच्या मला अनेक ऑफर्स आल्या होत्या. पण आम्ही सोबत काम करू शकलो नाही. असं नाही की आम्हाला एकत्र काम करायचं नव्हतं. मात्र चीची माझ्यासाठी हिंदी सिने विश्वातील बेस्ट डान्सर आहे'.

फराह पुढे म्हणाली की, 'गोविंदा एक बेस्ट डान्सर आहे. हे माहीत असूनही मी त्याला कोरिओग्राफ करू शकले नसते. कारण गोविंदाची गणेश आचार्यसोबत जोडी चांगली होती. जर मी गोविंदाला कोरिओग्राफ केलं असतं तर असं झालं असतं की, मी त्या लेव्हलची कोरिओग्राफर नाही ज्या लेव्हलचा गणेश आहे.

दरम्यान, फराह खान आणि गोविंदा दोघेही कॉमेडी शो दरम्यान एकत्र दिसले. या कॉमेडी शो कपिल शर्मा शो ला जोरदार टक्कर देण्यासाठी तयार आहे. या शोमध्ये भारतातील अनेक दमदार आणि टॉप कॉमेडिअन्स दिसणार आहेत. जे फॅन्सना पोट धरून हसायला लावतील. 

टॅग्स :फराह खानगोविंदाबॉलिवूड