Join us

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे फरहा अली खानला खटकले, कंगणाला सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 14:15 IST

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि मी कधीच तसे करणार नाही.

कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राऊत यांनी कंगनावर घणाघाती टीका केली होती. मुंबईवर, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर इथे राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला सुनावलं. मुंबईतील घरात पोहोचताच कंगनानं आपला पुढील निशाणा कोण असणार, हे स्पष्ट केलं होतं. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. कंगनानं ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनानं आव्हान देणारी भाषा केली आहे. 'उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उद्धवस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा हा अहंकार मोडून पडेल,' अशा शब्दांमध्ये कंगनानं मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.

अनेकांना कंगणाचा उद्धव ठाकरे यांचा अपमान करणे चांगलेच खटकले यावर तीव्र प्रतिक्रीयाही उमटल्या होत्या. कंगणा राणौतचा उद्धव ठाकरे यांचा अशा पद्धतीने अपमान करणे ऋतिकची मेहुणी फराह अली खानलाही रुचले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उच्चार करत त्यांचा कंगणाने अमपान केला असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मीडियावर  ट्वीट करत तिने कंगणावर संताप व्यक्त केला आहे.फराह अली खानचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

उद्धव ठाकरे  महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि  मी कधीच तसे करणार नाही. कारण मला निवडलेल्या प्रतिनिधींचा आदर करणे शिकवले गेले आहे, जरी मी त्यांच्या राजकारणाशी सहमत नसले तरीही.

सिनेमा करून कोणी राणी लक्ष्मीबाई होत नाही.

अनेक सेलिब्रेटी कंगणाच्या विरोधातही बोलताना दिसत आहेत.अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मीम शेअर केलंय ज्यावर लिहिलंय की, कंगना जर सिनेमा करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर या हिशेबाने दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झालेत. प्रकाश राज यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण जास्तीत जास्त लोक वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिका आठवून गंमत करत आहेत.

कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :कंगना राणौतहृतिक रोशन