Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदाना करिमीचा हा व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:40 IST

 मंदाना करिमीने अलीकडे आपला हॉट फोटो शेअर करून खळबळ माजवली होती. आता मंदानाने एक व्हिडिओ शेअर केलाय. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांची माथी भडकली आहेत. 

 मंदाना करिमीने अलीकडे आपला हॉट फोटो शेअर करून खळबळ माजवली होती. आता मंदानाने एक व्हिडिओ शेअर केलाय. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांची माथी भडकली आहेत. या व्हिडिओत मंदाना करिमी आपल्या मित्रांसोबत डान्स करताना दिसतेय. ब्लॅक बिकिनी टॉप आणि शॉर्ट्स घातलेली मंदाना बेधूंद होवून नाचतेय आणि सोबत सिगारेटचे झुरके घेतांनाही दिसतेय. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हा व्हिडिओ शेअर केला.

कदाचित लोकांना आपला हा बिनधास्त अंदाज आवडेल, असा तिचा अंदाज असावा. पण अनेकांना तिचा हा अंदाल जराही रूचला नाही. मग काय लोकांनी तिला चांगलेच धारेवर धरले. खुल्लमखुल्ला धूम्रपान करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यामागच्या तिच्या हेतूवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘स्मोकिंग सोडू शकत नसशील तर लोकांना फिटनेसबद्दल का सांगतेस?’ असा सवाल काहींनी तिला केला. तुझ्या हातातील सिगारेट देशातील तरूणाईला अतिशय चुकीचा संदेश देतेय, असे काहींनी तिला सुनावले. तू माझी आवडती आहेस. पण कदाचित तू डिप्रेशनमध्ये असावी, असे एकाने लिहिले. क़ाहींनी तर अतिशय अश्लाघ्य भाषेत मंदानावर टीका केली. अर्थात काहींनी मंदानाची बाजूही घेतली.तुम्हाला ठा्ऊक असेलचं की, मंदाना सध्या सिंगल लाईफ जगतेय. पती गौरव गुप्ताविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्यानंतर मंदाना अचानक चर्चेत आली होती. मंदानाने धर्म बदलून गौरवसोगत लग्न केले होते. पण तिचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. मंदाना ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. याशिवाय ‘रॉय’,‘भाग जॉनी’,‘मैं और चार्ल्स’,‘क्या कूल है हम3’मध्ये दिसली होती. सध्या मंदानाकडे कुठलाही चित्रपट नाही. पण ती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.