Join us  

पत्नी सोडून जाताच अशी झाली इमरान खानची अवस्था; चाहत्यांनी पडला प्रश्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 1:38 PM

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याचा भाचा इमरान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्थात त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या वैवाहिक आयुष्यातील कुरबुरींमुळे.

ठळक मुद्दे२०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याचा भाचा इमरान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्थात त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या वैवाहिक आयुष्यातील कुरबुरींमुळे.  गत चार वर्षांत इमरानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. आता त्याच्या संसारातही कुरबुर सुरु आहे. इमरान व त्याची पत्नी अवंतिका या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. केवळ इतकेच नाही तर  मतभेद इतके विकोपाला गेले आहेत की, इमरानचे घर सोडून अवंतिका आपल्या आईवडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे.  याचदरम्यान इमरान जिमबाहेर दिसला आणि त्याला पाहून सगळेच अवाक् झालेत. इमरानचे जिम बाहेरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि ते पाहून हे काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला. या फोटोत इमरान टी शर्ट, ग्रे शॉर्ट्स, ब्ल्यू कॅप आणि स्पोर्ट शूजमध्ये आहे. पण  तो अतिशय बारीक झालेला दिसतोय. त्याचे वजन घटल्याचे दिसतेय.

त्याच्यातील हा बदल नेटक-यांच्या नजरेतून सुटला नाही. नेटक-यांनी लगेच यावर प्रतिक्रिया देणे सुरु केले. ‘ही काय स्थिती झालीय तुझी?’ असा प्रश्न अनेकांनी त्याला केला. एका युजरने तर प्रचंड ताण, विभक्त झालेली पत्नी यामुळे इमरानचे वजन घटल्याचा अंदाज बोलून दाखवला. 

इमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. २००८ मध्ये इमरानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट राहिला आणि इमरानचे करिअर मार्गी लागले. पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही.

२०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. अलीकडे दिग्दर्शनात हात आजमवण्याचे प्रयत्न इमरानने सुरु केले होते. सध्या तो एका शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करतोय. या शॉर्टफिल्मचे नाव ‘मिशन मार्स : कीप वॉकिंग इंडिया’ आहे. 

 

टॅग्स :इम्रान खान