Join us  

रिलीजच्या तोंडावर ‘फन्ने खां’ वादात, वितरणाचा वाद कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 6:54 PM

रिलीजच्या ऐन तोंडावर ‘फन्ने खां’ हा चित्रपट वादात सापडला आहे. निर्माता वासु भगनानी यांनी ‘फन्ने खां’च्या मेकर्सविरोधात सुप्रीम कोर्टात त्यांनी यााचिका दाखल केली आहे. 

रिलीजच्या ऐन तोंडावर ‘फन्ने खां’ हा चित्रपट वादात सापडला आहे. निर्माता वासु भगनानी यांनी ‘फन्ने खां’च्या मेकर्सविरोधात सुप्रीम कोर्टात त्यांनी यााचिका दाखल केली आहे. उद्या १ आॅगस्टला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आपल्या याचिकेत वासु भगनानी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.हे संपूर्ण प्रकरण चित्रपटाच्या वितरण हक्काशी संबंधित आहे. वासु भगनानी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘फन्ने खां’चे वितरण हक्के त्यांच्या ‘पूजा एंटरटेनमेंट’ या कंपनीला देण्यात आले होते. यासाठी क्रिअर्ज एंटरटेनमेंटसोबत १० कोटींची डील झाली होती. यातील ८़५० कोटी त्यांना मिळाले होते. उर्वरित रक्कम चित्रपट रिलीज होण्याच्या आठवडाभरापूर्वी देण्याचे ठरले होते. सोबत चित्रपटात वासु भगनानी यांना सहाय्यक निर्मात्याचे क्रेडिट देण्याचेही ठरले होते. पण ऐनवेळी क्रिअर्ज एंटरटेनमेंटने करारातील अट मानण्यास नकार दिला आहे. उद्या बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.‘फन्ने खां’मध्ये अनिल कपूर, राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका आहेत. तूर्तास या चित्रपटातील ‘मेरे अच्छे दिन आ गए’ या गाण्यावरूनही वाद सुरू आहे. विरोधकांच्या मते, चित्रपटातील हे गाणे मोदी सरकारच्या कामगिरीवरची टीका आहे. राजकीय दबावापोटी अखेर मूळ गाणे हटवून ‘मेरे अच्छे दिन आये रे’ हे नवे गाणे रिलीज करण्यात आले. पण या नव्या गाण्याचाही भाजपसमर्थक आणि विरोधक वेगवेगळा अर्थ काढत आहेत.एकंदर काय तर रिलीजपूर्वीचं हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडला आहे. आता या सगळ्या वादांना तोंड देत ‘फन्ने खां’ प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :अनिल कपूर