Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! काजल अग्रवालला भेटण्यासाठी ‘जबरा’ फॅनने दिलेत 60 लाख, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 11:37 IST

भारतात बॉलिवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटींवर चाहते अगदी जीव ओवाळून टाकतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी जीवाचे रान करतात. अशाच एका ‘जबरा’ फॅनने आवडत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी काय करावे तर...

ठळक मुद्देया प्रकारानंतर काजल अग्रवालचा हा चाहता कमालीचा तणावात आला. या दबावात त्याने घरही सोडले.

भारतात बॉलिवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटींवर चाहते अगदी जीव ओवाळून टाकतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी जीवाचे रान करतात. अशाच एका ‘जबरा’ फॅनने आवडत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी काय करावे तर स्वत:चे 60 लाख गमावले.होय, दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या एका चाहत्याने हा कारनामा केला. तामिळनाडूच्या रामानाथपूरम येथे राहणा-या या चाहत्याला काजल अग्रवालला भेटायचे होते. यासाठी तो काहीही करायला तयार होता.

याचदरम्यान त्याला एका वेबसाईटची माहिती मिळाली. आम्ही तुमची काजल अग्रवालशी भेट घडवू, असा दावा या वेबसाईटवर करण्यात आला होता. या व्यक्तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, वेबपेज मेकर्सशी संपर्क साधला. आधी या वेबसाईटने संबंधित व्यक्तिला 50 हजार रूपये व पर्सनल डिटेल्स मागवले. काजलला भेटायच्या ओढीने या चाहत्याने लगेच 50 हजार रूपये आणि आपला काही अतिशय खासगी डाटा या वेबसाईटला दिला. यानंतर वेळोवळी या चाहत्याला पैशाची मागणी करण्यात आली आणि त्याने ती पूर्ण केली. पण इतके करूनही काजलशी मात्र त्याची भेट झाली नाही. अखेर आपण गंडवलो गेल्याचे या चाहत्याच्या लक्षात आले आणि तो भानावर आला. 

हा प्रकार इथेच थांबला नाही तर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चाहत्याने संबंधित वेबसाईटला पैसे देण्यास नकार दिला. यावर वेबपेज मेकर्सनी त्याचे पर्सनल डिटेल्स व खासगी फोटो लीक करण्याची धमकी दिली. तोपर्यंत हा चाहता 60 लाख रूपयांनी फसवला गेला होता.

या प्रकारानंतर काजल अग्रवालचा हा चाहता कमालीचा तणावात आला. या दबावात त्याने घरही सोडले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी अनेक प्रयत्नांती या चाहत्याला कोलकात्यातून  शोधून काढले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रवणकुमार नामक एका ठगाला अटक केली आहे.

टॅग्स :काजल अग्रवाल