तो फॅन ‘सनी’च्या गळ्यात पडला, अन् सोडता सोडेना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 12:55 IST
माजी पॉर्नस्टार व बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते आज जगभरात आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला ...
तो फॅन ‘सनी’च्या गळ्यात पडला, अन् सोडता सोडेना !
माजी पॉर्नस्टार व बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते आज जगभरात आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. तिच्यासोबत सेल्फी काढायला मिळाली तर चाहत्यांना स्वर्गतुल्य सुख मिळते पण तिच्या गळ्यात गळा घालून चक्क भेटण्याची संधी मिळाली तर काय होईल याचा फक्त विचारच केलेला बरा. पण ही संधी मिळाली एका चाहत्याला आणि तो काही केल्या मिठीच सोडेना.सनी लिओनच्या बाबतीत असे घडले एका चिमुकल्या फॅनकडून. सनी लिओनने त्याला कडेवर घेतले. तो तिच्या गळ्यात पडला. त्याला सनी लिओनचा इतका लळा लागला की तो तिची मिठीच सोडेना. त्या मुलाच्या पालकांनी बराच प्रयत्न करुन पाहिला पण फॅन काही मानायला तयार होईना.हा व्हिडिओ सनी लिओनने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. सनीला या छोट्या चाहत्याचे खूप कौतुक वाटले आहे.