Join us

​‘बिल्लो रानी’चा असाही एक फॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 13:51 IST

सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, ऑटोग्राफ, फोटोग्राफ आणि आता सेल्फी घेण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असतात. त्यांच्यासोबत दिसण्याची ...

सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, ऑटोग्राफ, फोटोग्राफ आणि आता सेल्फी घेण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असतात. त्यांच्यासोबत दिसण्याची एकही संधी फॅन्स सोडत नाहीत. अशीच संधी बिल्लो रानी अर्थात हॉट बंगाली बाला अभिनेत्री बिपाशा बासूच्या एका फॅनला मिळाली. बिप्सचे फॅन्स तर बरेच आहेत. मात्र या फॅन्सची बातच काही न्यारी. कारण बिपाशाला आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी हा  पोहचला तिच्या घराच्या गेटपाशी. बिपाशा गेटच्या बाहेर पडताना लक्षात येताच तिच्या बाजूला जाऊन या फॅनने सेल्फी घेण्याची संधी सोडली नाही. तिच्या अगदी बाजूला उभं राहून त्यानं हा सेल्फी क्षण आपल्या कॅमे-यात कैद केला. आता हा फॅन सेल्फी घेतोय हे बिपाशाच्या लक्षात आलं की नाही कुणास ठाऊक. कारण फॅन्सना सेलिब्रिटी आपल्या जवळही येऊ देत नाहीत. मात्र हा फॅन थेट बिप्सच्या अगदी जवळ पोहचला होता. आता या फोटोतले बिप्सच्या चेह-यावरील भाव पाहून तुम्हीच ठरवा की तिच्या या सेल्फीला हरकत होती की नाही ?