Join us  

Fat to fit! गणेश आचार्यची वेट लॉस जर्नी; 200 किलो वजनावरुन थेट 98 किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:00 AM

Ganesh acharya: २०१५ मध्ये त्यांचं वजन २०० किलो होतं. मात्र, अथक परिश्रम, वर्क आऊट यामुळे त्यांनी अवघ्या काही वर्षात  वजन कमी करुन ९८ किलोपर्यंत आणलं.

आपल्या तालावर अनेक दिग्गज कलाकारांना नाचवण्याचं कसब असणारा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक म्हणजे गणेश आचार्य (Ganesh Acharya). अलिकडेच त्यांनी त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगताना दिसते. उत्तम नृत्यशैलीसह गणेश आचार्य त्यांच्या वाढत्या वजनामुळेही अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र, गणेश आचार्य यांनी काही वर्षांपूर्वीच त्यांच्या फिटनेसवर काम करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी तब्बल २०० किलो वजन अवघ्या काही काळात थेट ९७ वर आणून ठेवलं. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या वेट लॉस जर्नीविषयी भाष्य केलं आहे.

वजनदार शरीर असूनही उत्तम नृत्यदिग्दर्शनाचं कौशल्य यामुळे गणेश आचार्य कायमच चर्चत राहिले. २०१५ मध्ये त्यांचं वजन २०० किलो होतं. मात्र, अथक परिश्रम, वर्क आऊट यामुळे त्यांनी अवघ्या काही वर्षात  वजन कमी करुन ९८ किलोपर्यंत आणलं.  या वेट लॉस प्रवासाविषयी त्यांनी २०१७ मध्ये एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत सध्या चर्चेत आली आहे.

“वजन कमी करण्याचा प्रवास माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. दीड वर्षापासून मी माझ्या शरीरावर विविध पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काम करत होतो. ‘हे ब्रो’ (2015) या चित्रपटासाठी मी 30 ते 40 किलो वजन वाढवले ​​होते. मात्र, त्यानंतर माझे वजन 200 किलोपर्यंत पोहोचले. आता मी तेच वजन कमी करत आहे,” असं या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, या मुलाखतीच्या काळातही त्यांची वेट लॉस जर्नी सुरुच होती. यात अथक परिश्रम केल्यानंतर त्यांनी त्यांचं वजन कमी करत चक्क ९८ किलोपर्यंत आणून ठेवलं. त्यांच्या या प्रवासात त्यांना जीम ट्रेनर अजय नायडू यांनी विशेष मदत केली. तसंच त्यांनी जीम, स्विमिंग, व्यायाम, वॉकिंग अशा गोष्टी करत वजन नियंत्रणात आणलं.

टॅग्स :गणेश आचार्यबॉलिवूडसेलिब्रिटी