Join us

भूमी सोनमच्या ‘स्टाईल’वर फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 21:01 IST

‘दम लगा के हईशा’ फेम भूमी पेडणेकर कशावर फिदा असेल तर सोनम कपूरच्या ड्रेसिंग स्टाईलवर. होय, सोनमच्या ड्रेसिंग स्टाईलची प्रशंसा करताना ...

‘दम लगा के हईशा’ फेम भूमी पेडणेकर कशावर फिदा असेल तर सोनम कपूरच्या ड्रेसिंग स्टाईलवर. होय, सोनमच्या ड्रेसिंग स्टाईलची प्रशंसा करताना भूमी जराही थकत नाही. सोनम बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनेकजण सोनम कॅरी करत असलेल्या फॅशनची प्रशंसा करताना दिसतात. पण भूमीची बात काही औरच आहे. सोनमचा प्रत्येक गुण भूमीला आवडतो. भूमी सांगते,स्टाईलसंदर्भात वेगवेगळे प्रयोग करायला हिंमत लागते. विशेषत: कलाकारांसाठी हे सोपे नसते. एक कलाकार म्हणून मला हे कळून चुकले आहे आणि म्हणूनच स्वत:च्या स्टाईलसंदर्भात नवनवे प्रयोग करणारे लोक मला आवडतात. सोनमही त्यापैकीच एक आहे. पोशाख कुठलाही असो सोनम त्यात खुलून दिसते. आजपर्यंत असा एकही ड्रेस नाही जो सोनमवर खुलून दिसला नसेल. ती खºया अर्थात स्टाईल क्वीन आहे.