Join us  

Faisal Khan on Sushant Singh Rajput: 'सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही, खून झाला', फैसल खानचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:28 PM

Faisal Khan: आमिर खानचा भाऊ फैसल खानने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Faisal Khan on Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला जाऊन 2 वर्षे झाली आहेत. पण, अद्याप त्याच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही. चाहते असोत किंवा सुशांतच्या कुटुंबातील व्यक्ती, सर्वांना सुशांतच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खान याने सुशांतच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. फैसल खानने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले आहे. सुशांतचा खून ?टाईम्स नाऊ नवभारतशी बोलताना आमिर खानचा भाऊ फैसल खानने एक मोठा खुलासा केला आहे. फैजल खानने मुलाखतीत म्हटले की, 'मला माहित आहे की, सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली आहे. सत्य बाहेर येईल अशी आशा आहे. हे प्रकरण कधी उघडणार हे येणारा काळच सांगेल. यामध्ये अनेक एजन्सींचा सहभाग आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी सत्य बाहेर येत नाही, हे दुर्दैवी आहे. मी फक्त प्रार्थना करतो की सत्य बाहेर यावे,' असे फैसल खान म्हणाला.

सुशांतचा अपमान केलासुशांतबद्दल बोलताना फैसल खान पुढे म्हणाला की, 'मी बॉलिवूड बॉयकॉटला सपोर्ट करतो. सुशांत मोठा झाला असता, पण त्याचा खून केला. हे कोणी केले मला माहीत नाही, त्याच्या मृत्यूमागे मोठे रहस्य दडले आहे. मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने त्याला साइन केले आणि नंतर काम काढून घेतले. सुशांतचे काम अतिशय चांगले होते, त्यामुळेच त्याचा आत्मविश्वासाला तोडण्यासाठी, त्याचा अपमान केला. एक वेळ अशी येईल की हा उद्योग संपेल, पडझड सुरू झाली आहे,' असेही फैसल म्हणाला.घराणेशाहीवरही टीकायासोबतच फैसल खानने बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही भाष्य केले. फैसल खान म्हणाला की, 'बॉलिवूडमध्ये खूप भ्रष्टाचार आहे. इथे घराणेशाहीचेच राज्य आहे. घराणेशाहीतून तुम्हाला चित्रपट मिळेल, पण जर तुमच्यात हिंमत नसेल आणि काम माहित नसेल तर तुम्ही टिकू शकणार नाही. सिनेमातही खूप गटबाजी आहे, जर तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये नसाल तर तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.'

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतफैजल खानबॉलिवूड