Join us

‘चेहरा ही आईना हैं...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:20 IST

अगदी आत्ता आत्तापर्यंत सोशल मीडियावर इनअ‍ॅक्टिव्ह असलेली कॅटरिना कैफ अचानक  जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतचे चॅट, ...

अगदी आत्ता आत्तापर्यंत सोशल मीडियावर इनअ‍ॅक्टिव्ह असलेली कॅटरिना कैफ अचानक  जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतचे चॅट, स्वत:चे वेगवेगळे व्हिडिओ, पोस्ट शेअर करणे कॅटला आवडू लागले आहे़.अलीकडे अशाच चॅटवर गप्पा मारताना कॅट काहीशी नाराज दिसल़ी़ यावर एका चाहत्याने तिला लगेच प्रश्न केला़ कॅटरिना, आज तू जरा नाराज दिसतेय, असे त्याने विचारले़ यावर कॅटने काय उत्तर दिले माहितीयं? ती म्हणाली, माझा चेहरा एखाद्या आरशासारखा आहे.मी आनंदी असेल तर तो आनंद लगेच माझ्या चेहºयावर प्रतिबिंबित होतो. मनात विचार सुरू असतील तर तेही माझ्या चेहऱ्यावर दिसतं. कदाचित त्यामुळेच मी अभिनेत्री झालेयं. कॅटचे हे ‘स्मार्ट’ उत्तर ऐकून चाहत्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले़, हे सांगायला नकोच!