Join us

सलमान खान मोबाईल प्रकरणावर प्रत्यक्षदर्शीने आणले 'हे' सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:16 IST

सलमान खान विरोधात दुपारी एका पत्रकाराने तक्रार दाखल केली होती. फोन हिसकावून गैरवर्तन केल्याचा आरोप अशोक श्याम लाल पांडे या पत्रकाराने सलमानवर केला आहे.

ठळक मुद्देबॉडीगार्डने तो फोन त्या पत्रकाराला परत दिल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलेसलमानच्या बॉडीगार्डनेही या प्रकरणासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे

सलमान खान विरोधात दुपारी एका पत्रकाराने तक्रार दाखल केली होती. फोन हिसकावून गैरवर्तन केल्याचा आरोप अशोक श्याम लाल पांडे या पत्रकाराने सलमानवर केला आहे. जुहूच्या रस्त्यावर सलमान सायकलिंग करताना संबंधित पत्रकार व त्याचा कॅमेरामॅनने त्याचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ शूट करताना पाहून सलमान भडकला आणि त्याने संबंधित पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला असा आरोप त्यांने केला होता. 

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, सलमान खान सायकलिंग करत असताना त्याच्या बाजूला एक कार आली. या कारमध्ये बसलेल्या लोकांनी सलमानचे फोटो आणि व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. सलमानने त्यांना  इशाऱ्यामध्ये व्हिडीओ शूट करु नका असे सांगितले. ऐवढंच नाही तर त्याच्या बॉडीगार्डने सुद्धा त्यांना शूटिंग करु नका असे सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी व्हिडीओ बनवणे सुरुच ठेवले, हे सलमानने पाहिलं आणि त्याने पुन्हा एकदा त्यांना चेतावणी दिली. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष करत फोटो काढणे आणि व्हिडीओ करणे सुरुच ठेवले. यानंतर मात्र सलमानने पुढे येत त्यांचा फोन काढून घेतला असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. थोडे पुढे जाऊन सलमानने हा फोन त्याच्या बॉडीगार्डला दिला. बॉडीगार्डने तो फोन त्या पत्रकाराला परत दिल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.      

सलमानच्या बॉडीगार्डनेही या प्रकरणासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सलमानचा पाठलाग करण्याचा आणि विना परवानगी व्हिडीओ शूट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणते नवं वळणं घेणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

टॅग्स :सलमान खान