सिक्वेल्सकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा - रिचा चढ्ढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 18:03 IST
अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने ‘सरबजीत’ चित्रपटात सरबजीतच्या पत्नीची भूमिका केलीय. या चित्रपटानंतर तिच्या करिअरला एकदम कलाटणीच मिळाली. आता ती ...
सिक्वेल्सकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा - रिचा चढ्ढा
अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने ‘सरबजीत’ चित्रपटात सरबजीतच्या पत्नीची भूमिका केलीय. या चित्रपटानंतर तिच्या करिअरला एकदम कलाटणीच मिळाली. आता ती फु करे चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटांच्या सिक्वेलविषयी ती सांगते,‘ प्रेक्षकवर्गाला सिक्वेल्सकडून खुप अपेक्षा असतात. त्यासाठी एक कलाकार म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो की प्रेक्षकांना सिक्वेलही आवडावा. पण आता तो ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे की तो कितपत प्रेक्षकांच्या पचनी पडतो. आम्ही जेव्हा फुकरे शूट केला तेव्हा आम्ही सर्वजण खुप नवीन होतो. पण आता काळ लोटला तसा आमचा अनुभवही वाढला.’ ‘मसान’,‘लव्ह सोनिआ’,‘पॉवरप्ले’ चित्रपटांनंतर आता तिला तिच्या जबाबदारीचे भान आले आहे. खुप दिवसांनंतर तिचा आवडीचा कलाप्रकार ‘कॉमेडी’ कडे वळली आहे. तिने नुकतेच वेब सीरिज ‘पॉवरप्ले’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. क्रिकेट जगतातील भ्रष्टाचार या कथानकावर आधारित मालिकेत विवेक ओबेरॉय, अंगद बेदी आणि तनुज विरमनी हे कलाकार असतील. वेब सीरिजमध्ये काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली,‘वेब सीरिजच्या शूटिंगचा माझा अनुभव फारच वेगळा होता. मी त्यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. टीव्ही किंवा चित्रपट तुम्ही कशातही काम करा, तुम्हाला परिश्रम हे घ्यावेच लागतात. या सीरिजचे लेखन खुपच शार्प होते. मी या सीरिजमध्ये माझी भूमिका जरिना साकारण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले.’