‘कॅबारेट’ प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:09 IST
अभिनेत्री रिचा चढ्ढाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कॅबारेट’च्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना. दोन वेळा प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. २७ मे ...
‘कॅबारेट’ प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना!
अभिनेत्री रिचा चढ्ढाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कॅबारेट’च्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना. दोन वेळा प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. २७ मे नंतर आता १० जून रोजीही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सहनिर्माती पूजा भट्टच्या अनुसार कॉपीराईटचे उल्लंघन झाल्यामुळे हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे तिने सांगितले. या संदर्भात ट्विट करुन तिने आपले मत व्यक्त केले आहे. }}}} }}}} }}}} }}}}कॅबारेटची अंतिम डेट अजूनही जाहीर झाली नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक कौस्तव नारायण नियोगी यांच्या अनुसार काही कलात्मक बदल असल्याने चित्रपट प्रदर्शित होत नसल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. आम्ही संपूर्ण चित्रपट केला आहे. चित्रपट प्रदर्शनाला उशीर होत असल्याची कारणे वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.