Join us

Exclusive: अंग तापाने फणफणत असताना हनीने पूर्ण केले शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:09 IST

रॅपर यो यो हनी सिंह म्हणजे तरूणाईच्या गळ्यातील ताईत. कामाच्या बाबतीत यो योला कुठलीही तडजोड मान्य नाही. लवकरच हनी ...

रॅपर यो यो हनी सिंह म्हणजे तरूणाईच्या गळ्यातील ताईत. कामाच्या बाबतीत यो योला कुठलीही तडजोड मान्य नाही. लवकरच हनी ‘जोरावर’ या पंजाबी रोमॅन्टिक अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे हनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. साहजिकच चित्रपटाबद्दल तो कमालीचा उत्सूक आहे. हीच उत्सूकता त्याच्या कामातही झळकत आहे. अगदी अंग तापाने फणफणत असतानाही हनीने ‘जोरावर’चे शूटींग शेड्यूल पूर्ण केले.त्याचे झाले असे की, चित्रपटाच्या टीमला डरबन मूसामभिदा स्टेडियममध्ये एक अ‍ॅक्शन दृश्याची शूटींग पूर्ण करायची होती. या शूटसाठी हनी प्रचंड उत्साहित होता. हनी आजारी असल्याचे त्याच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होते. याऊपरही वेळ न घालवता हनीने हा अ‍ॅक्शन सीन पूर्ण केला. चित्रपटाचे दिग्दर्शक विनिल यांनी सांगितले की, हनीच्या अंगात ताप होता. मात्र तरिही शूट न थांबवता हनीने पहिला अ‍ॅक्शन सीन पूर्ण केला. कारण आम्हाला केवळ दोन तासांसाठी स्टेडियम मिळाले होते. त्या दोन तासांत आम्हाला आमचे शूट पूर्ण करणायचे होते, हे हनी जाणून होता. डरबनमध्ये शूट होते. त्यामुळे तिथे प्रचंड कडाक्याची थंडी होती. मात्र अशा प्रतिकूल स्थितीतही हनीने काम न थांबवता, ते पूर्ण केले. जेव्हा केव्हा ब्रेक मिळायचा, तेव्हाच हनी आराम करायचा. साहजिकच हनीचे कामाबद्दलचे ही समर्पक वृत्ती पाहून चित्रपटाचे क्रू  मेंबर्स इंम्प्रेस झाले नसतील तर नवल!! पीटीसी मोशन पिक्चर्स, राजी एम शिंदे व रवींद्र नारायणद्वारा निर्मित तसेच विनिल मार्कनद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात पारूल गुलाटी, गुरबानी न्यायाधीश, पवन मल्होत्रा, मुकुल देव आणि अचिंत कौर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या ६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.