Join us  

अनुरागची दुसरी एक्स वाइफ कल्कि आली त्याच्या सपोर्टसाठी समोर, म्हणाली - प्रिय अनुराग....

By अमित इंगोले | Published: September 21, 2020 2:49 PM

पहिली एक्स वाइफ आरती बजाजनंतर आता त्याची दुसरी एक्स वाइफ कल्कि केकलांही त्याच्या सपोर्टसाठी समोर आली आहे. कल्किने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचारासारखा खळबळजनक आरोप लावला. पण अनुरागने तिने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज अनुरागच्या सपोर्टमध्ये समोर आलेत.  इतकेच काय तर अनुरागची पहिली एक्स वाइफ आरती बजाजनंतर आता त्याची दुसरी एक्स वाइफ कल्कि केकलांही त्याच्या सपोर्टसाठी समोर आली आहे. कल्किने अनुरागसाठी इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

सोशल मीडियात सतत अ‍ॅक्टिव राहणारी अभिनेत्री कल्किने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'प्रिय अनुराग सोशल मीडियात सुरू असलेल्या या सर्कसला स्वत:वर स्वार होऊ देऊ नकोस. तू तुझ्या स्क्रीप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढला आहेस. तू तुझ्या पर्सनल लाइफसोबत प्रोफेशनल लाइफमध्येही त्यांच्या सन्मानाची रक्षा केली आहेस. मी याची साक्षीदार आहे. कारण प्रोफेशनल आणि पर्सनल स्पेसमध्ये तू मला बरोबरीची जागा दिली आहे'.

कल्किने पुढे लिहिले की, 'इतकेच काय तर आपल्या घटस्फोटानंतही तू माझ्या सन्मानासाठी उभा राहिला होता. आपण सोबत येण्याआधीपासून मी काम करायला घाबरत होते तेव्हापासून मला सपोर्ट केलाय. काळ वाईट आहे. सगळे एकमेकांना शिव्या देत आहेत आणि खोटे आरोप लावत आहेत. तुला अशात मजबूत राहण्याची गरज आहे'.

पहिल्या पत्नीनेही केली पोस्ट

आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, 'अनुराग कश्यप तू रॉकस्टार आहेस. ज्याप्रकारे तू महिलांना सशक्त करतो, तसं करणं आणि त्या सर्वांसाठी सुरक्षित स्थळ तयार करणं सुरू ठेव. हे मी सर्वातआधी आपल्या मुलीत बघते. जगात जराही इमानदारी शिल्लक राहिलेली नाही आणि जगात बेकार लोक भरलेले आहेत. जर हे लोक त्यांच्या ऊर्जेचा वापर द्वेष पसरवण्यात लावत नसते आणि त्याचा रचनात्मक वापर झाला असता तर जग आणखी चांगलं झालं असतं.

आधी राग, मग हसू...

आरती बजाजने लिहिले की, 'आतापर्यंतचा हा सर्वात घाणेरडा स्टंट होता. यावर मला आधी राग आला आणि नंतर हसू आलं. मला वाईट वाटतंय की, तुला यातून जावं लागतंय. हीच त्यांची लेव्हल आहे. नेहमी उंचीवर रहा आणि आपला आवाज उठवणं सुरू ठेव. आमचं तुझ्यावर प्रेम आहे'.

काय म्हणाली होती पायल?

पायल घोषने ट्विट करत लिहिले होते की, 'अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तन केलं. पीएमओ आणि नरेंद्र मोदीजी यावर अ‍ॅक्शन घ्या. या क्रिएटीव्ह व्यक्तीच्या मागे लपलेला राक्षस देशाला दाखवा. मला हे माहीत आहे की, तो मला नुकसान पोहोचवू शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा'.

अनुरागने फेटाळले आरोप

अनुराग कश्यपने या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत या आरोपांना उत्तर दिले़. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले. त्याने लिहिे की, 'क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत', असे पहिले ट्विट अनुरागने केले.

हे पण वाचा :

अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली राधिका आपटे, म्हणाली - 'तुझ्यासोबत नेहमीच सुरक्षित वाटलं'

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली

टॅग्स :कल्की कोचलीनअनुराग कश्यपबॉलिवूडलैंगिक छळ