भज्जीची वाईफ लपवतेयं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 19:06 IST
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक आनंददायी बातम्या ऐकायला मिळत आहे. अलीकडे सलमान खानची बहिण अर्पिताने एका गोड बेबीला जन्म दिला. त्याआधी ...
भज्जीची वाईफ लपवतेयं तरी काय?
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक आनंददायी बातम्या ऐकायला मिळत आहे. अलीकडे सलमान खानची बहिण अर्पिताने एका गोड बेबीला जन्म दिला. त्याआधी राणीने क्यूट बेबीची वार्ता दिली. शाहीद कपूर व मीरा राजपूत यांच्याकडे गोड बातमी आहेत आणि हरभजन सिंह याची अॅक्ट्रेस वाईफ गीता बसरा ही सुद्धा लवकरच आई होणार आहे. नुकतीच गीताने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला. यात गीता विमानात बसलेली आहे आणि मनमोकळी हसते आहे. शिवाय पिलोने काहीतरी लपवण्याचाही प्रयत्न करतेयं...होय, अगदी बरोबर, गीता आपले बेबी बंप लपवत आहे. या फोटोत आई बनण्याचा आनंद गीताच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसतो आहे. आयपीएलदरम्यान ती भज्जीसोबत दिसली होती. यावेळी गीताने अगदी सैल कपडे व आरामदायक शूज कॅरी केले होते. अर्थात या कपड्यांमध्येही गीताचे बेबी बंप दिसले होतेच.