एपिक सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 11:10 IST
काल टवेंटी टवेंटी क्रिकेटमध्ये भारत व्हर्सेस पाकिस्तान मॅच आपण पाहिली.
एपिक सेल्फी!
काल टवेंटी टवेंटी क्रिकेटमध्ये भारत व्हर्सेस पाकिस्तान मॅच आपण पाहिली. भारत जिंकल्याने सर्वत्र उत्साह, जल्लोष, आतषबाजीचे वातावरण होते. अनेक सेलिब्रिटींनी टिवटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.अभिषेक बच्चन त्या सर्वांपैकी एक़ त्याने वडील अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, निता अंबानी आणि सचिन तेंडुलकर यांचा एकत्र सेल्फी पोस्ट केला आहे. कॅप्शन टाकले आहे की, ‘ कम आॅन! वेल प्लेयड इंडिया!’ बिग बी यांनीही मॅचच्या अगोदर राष्ट्रगीत गाऊन सर्वांचा उत्साह वाढवला.अभिषेकशिवाय सुशांतसिंग राजपूत, अफताब शिवदासानी आणि आयुषमान खुराना हे देखील इडन गार्डन्सला उपस्थित होते. अभिषेक सध्या हेराफेरी ३ साठी जॉन अब्राहम, परेश रावळ आणि सुनिल शेट्टी सोबत काम करत आहे.